दिल्ली, मुंबईसह चेन्नईत कोरोनाचा कहर होतोय कमी, तरीही तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

national falling rvalues in chennai delhi and mumbai point to covid slowdown
दिल्ली, मुंबईसह चेन्नईत कोरोनाचा कहर होतोय कमी, तरीही तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा

दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये कोविडचा आर-व्हॅल्यू कमी झाला असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. म्हणजेच या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण या दरम्यान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, या टप्प्यावर येऊन निष्काळजीपणा केला तर कोरोनाच्या संसर्गामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. स्टॅटिस्टिक्स अँड अॅप्लिकेशन्स मासिकात प्रकाशित केलेला आर-वॅल्यू (rvalues) असा आहे. दिल्लीमध्ये ०.६६, मुंबईमध्ये ०.८१ आणि चेन्नईमध्ये ०.८६ आहे, हा देशाच्या तुलेनत १.१६च्या तुलनेत खूपच कमी आहे.

आर-व्हॅल्यू म्हणजे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात येऊन संसर्ग झालेल्या व्यक्तीची संख्या. सध्या देशात सर्वात जास्त आर-व्हॅल्यू १.४८ आंध्र प्रदेशचे आहे. दिल्लीचे ०.६६ आर-व्हॅल्यूचे स्पष्टीकरण देताना या अभ्यासाचे नेतृत्व करणारे चेन्नईचे गणित विज्ञान संस्थानातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक सीताब्रा सिन्हा म्हणाले की, देशाच्या राजधानीत कोरोना लागण झालेल्या १०० लोक ६० लोकांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकतात.

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, कलकत्ता येथील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक दिव्येंदु नंदी म्हणाले की, समाजात अशा प्रकारचा आर-व्हॅल्यू कमी होण्याचा अर्थ असा की, महामारी कहर कमी होत आहे. कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठीच्या उपायांच्या मदतीने भविष्यात अजून कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. त्यांनी पुढे सांगितले की, सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आर-व्हॅल्यू कमी म्हणजे एक बाधित व्यक्ती जास्तीत जास्त एक अन्य व्यक्तीला बाधित करत आहे. तरीही अशा परिस्थितीत येऊन सावधानगिरी बाळगली पाहिजे. या टप्प्यावर येऊन कोणताही निष्काळजीपणा केला नाही पाहिजे.


हेही वाचा – कोरोना रुग्णांची लूट; बोरिवलीतील एपेक्स रुग्णालयावर कारवाई