घरताज्या घडामोडीNCB Raid: क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाई नंतर NCBची नवी मुंबईतल्या बेलापूर येथे...

NCB Raid: क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाई नंतर NCBची नवी मुंबईतल्या बेलापूर येथे छापेमारी

Subscribe

ड्रग्ज पेड्लर्स हे बदलापूर आणि मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील असल्याची माहिती

एनसीबीने (NCB) काल केलेल्या मोठ्या छापेमारीनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) याच्यासह १० जणांना ताब्यात घेतले.  एनसीबीकडून सर्वांची चौकशी सुरू होती. याच चौकशीदरम्यान एनसीबीच्या हाती मोठी माहिती मिळाली आहे. क्रूज ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party)  मध्ये आरोपींच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने नवी मुंबईच्या बेलापूर ( New Mumbai Belapur) येथे धाड टाकत छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत एनसीबीच्या हाती काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ( NCB raid at Belapur Navi Mumbai in the based of investigation action against Cruise Drugs Party)

काल रात्री एनसीबीने क्रूझ ड्रग्ज प्रकरणी कारवाई केल्यानंतर सकाळी आरोपींना मुंबईत आणण्यात आले. रविवारी रात्रीपासूनच आरोपींची कसून चौकशी करत होते. आरोपींना ड्रग्ज सप्लाय कुठून होत होता याची चौकशी एनसीबीकडून करण्यात येत होती. चौकशीदरम्यान काही ड्रग्ज पेड्लर्स हे बदलापूर आणि मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील असल्याची माहिती समोर आली त्यानुसार, एनसीबीची एक टिम एक सीएसएमटी येथे गेली असून तिथे देखील छापेमारी सुरू असून दुसऱ्या टीमने बेलापूर येथे छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

एनसीबीच्या मुंबई अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझवर छापा टाकला. या छापेमारीत MDMA/ एक्स्टसी, कोकेन, MD (मेफेड्रोन) आणि चरस सारख्या विविध वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थांचा इतका मोठा साठा क्रूझवर येण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या कपड्याचा वापर करण्यात आला.

ड्रग्ड प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सध्या एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान आर्यनने ‘मला व्हिआयपी गेस्ट म्हणून पार्टीला बोलावण्यात आले होते. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलवण्यात आले’,  असल्याचा खुलासा केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NCBची मोठी कारवाई; शिपवरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीची धाड; बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह १० जण ताब्यात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -