घरताज्या घडामोडीNCBची मोठी कारवाई; शिपवरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीची धाड; बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह १०...

NCBची मोठी कारवाई; शिपवरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीची धाड; बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह १० जण ताब्यात

Subscribe

एनसीबीच्या एका टीमने ड्रग्स पार्टीवर मोठी कारवाई केली आहे. माहितीनुसार मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्स पार्टी होणार होती. या माहितीच्या आधारावर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि गेल्या सात तासांपासून ऑपरेशन सुरू होते. या शिपवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ते आपल्या पथकासोबत मुंबईतील त्या शिपवर प्रवास करत होते. परंतु जेव्हा शिप समुद्राच्या मध्यावर पोहोचली, तेव्हा एक ड्रग्स पार्टीचे आयोजन केले. त्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे सेवन करत असल्याचे पाहिले गेले. त्याचदरम्यान एनसीबीच्या पथकाने कारवाई केली आणि त्यांनी आपले सीक्रेट ऑपरेशन सुरू केले. एनसीबीचे अधिकारी प्रवासी झाले असल्यामुळे शिपमधल्या या ऑपरेशनचे तिथल्या लोकांना चाहूलही लागली नाही. अनेक आरोपींना एनसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, एनसीबीच्या या ऑपरेशन दरम्यान एका बॉलिवूड अभिनेत्याचा मुलग्याला ताब्यात घेतले आहे. शिवाय इतर १० आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीने पहिल्यांदाच शिपवरील ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केल्यामुळे ही मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या शिपची ओपनिंग काही दिवसांपूर्वीच झाली होती आणि या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्मन्स केला आहे.

ज्या शिपवर एनसीबीने कारवाई केली आहे, ती मुंबईची Cordelia Cruise आहे. उद्या, रविवारी या सर्व आरोपींना मुंबईत आणले जाईल. गेल्या सात तासांपासून एनसीबीचे पथक समुद्राच्या मध्य भागामधील शिपवर ऑपरेशन करत होते. यापूर्वी एनसीबीने अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत, परंतु असे सीक्रेट ऑपरेशन कधी पाहिले नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र यावेळेस सीक्रेट ऑपरेशन जारी करून एनसीबीला यात यश मिळाले आहे. एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन आणि एमडी जप्त केले आहे.

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -