घरमुंबईयुटीएस अ‍ॅप युजर्सच्या नवा विक्रम

युटीएस अ‍ॅप युजर्सच्या नवा विक्रम

Subscribe

एका दिवसात 81 हजार तिकीटे बुक

मध्य रेल्वेने युटीएस अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज 81 हजार तिकीटांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंतचा हा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत. मुंबईतील तिकीट खिडक्यांवरील वाढत्या गर्दीपासून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने युटीएस अ‍ॅपची निर्मिती केली होती. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एप्रिल 2017 ला युजर्सची संख्या एकूण 3 लाख 74 हजार होती. सुरूवातीला अल्प प्रतिसाद होता. मात्र मध्य रेल्वेने या युटीएस मोबाइल अ‍ॅपची लोकप्रिय वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली होती. जून 2019 मध्ये युटीएस अ‍ॅप युजर्सची एकूण संख्या 6 लाख 23 हजार 308 इतकी होती. मात्र ऑगस्टपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील युटीएस अ‍ॅप युजर्सची एकूण संख्या 8 लाख 15 हजार 229 इतकी झाली आहे.मुंबईमध्ये 21 सप्टेंबर 2019ला 81,125 तिकिटे घेतली गेली. जी आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आहेत.

- Advertisement -

तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी 2015 मध्ये युटीएस नावाचे मोबाईल अ‍ॅप तयार केले होते. हे अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टम (सीआरआयएस) कडून तयार करण्यात आले होते. रेल्वेने हे अ‍ॅप मोबाईलवर उपलब्ध करून दिले आहे. ते अनारक्षित (अनरिझर्व्ह) तिकिटांसाठी आहे. रेल्वे मार्गावरील एकूण प्रवासी संख्येच्या 11.06 टक्के संख्या युटीएस अ‍ॅप युजर्सची आहे. यासह युटीएस अ‍ॅपद्वारे तिकीट काढल्यावर पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे प्रवाशांमध्ये युटीएस अ‍ॅपची पसंती वाढली असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -