घरमुंबईलांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी वसई रोडला नवे टर्मिनस

लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी वसई रोडला नवे टर्मिनस

Subscribe

पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या दोन स्थानकांतून सोडण्यात येतात. त्यामुळे या दोन स्थानकांवर प्रवाशांचा मोठा भार पडतो. त्यामुळे या दोन स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी वसई रोड येथे लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी नवे टर्मिनस साकारण्याची पश्चिम रेल्वेची योजना आहे. या योजनेला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प वेगाने साकारला जाणार असून २०२३ पर्यंत तो पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या दोन टर्मिनसवरील ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वसई येथे नवे टर्मिनस उभारण्याची योजना आखली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या दोन स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी आशा पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केली.

- Advertisement -

या टर्मिनससाठी खासगी आणि सरकारी जमिनीची आवश्यकता आहे. पश्चिम रेल्वे सध्या या प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज काढत आहे. येथील जमीन अधिग्रहणाचा सर्व्हे पुढच्या काही महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

असे असेल वसई टर्मिनस

वसई येथील नवीन टर्मिनस हे ४ प्लॅटफॉर्मचे असेल. ३ स्टबलिंग लाईन लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीदेखील असतील. प्रीमियम ट्रेन, नवी असलेली राजधानी एक्स्प्रेस आणि २० इतर पॅसेंजर ट्रेन येथून सोडण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -