घरताज्या घडामोडीसचिन वाझेला ७ एप्रिल पर्यंत NIA कोठडी!

सचिन वाझेला ७ एप्रिल पर्यंत NIA कोठडी!

Subscribe

अँजिओग्राफीची गरज असल्याचा सचिन वाझेंच्या वकिलांचा दावा

मुकेश अंबानी याच्या घराजवळ मिळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे याच्या कोठडीत ७ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सचिन वाझे याची एनआयए कोठडी संपल्यानंतर एनआयएच्या पथकाने वाझेला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते, सचिन वाझेला हृदय विकार असून, नुकताच त्याला स्ट्रोक येऊन गेला असे न्यायालयात वाझेच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र वाझेना योग्य उपोचार मिळत असून त्याच्या रक्त चाचणी आणि टू डी इको करण्यात आल्याची माहिती एनआयएने न्यायालयात दिली आहे.

एनआयएच्या अटकेत असणाऱ्या सचिन वाझे याची एनआयए कोठडी शनिवारी संपल्यामुळे त्याला तिसऱ्यांदा विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर वाझे याच्या वकिलांनी सचिन वाझेला हृदय विकाराचा त्रास असून रविवारी त्याला कोठडीत असताना एक स्ट्रोक येऊन गेला असल्याची माहिती न्यायालयाला दिली, तसेच वाझे याला अँजिओग्राफीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

- Advertisement -

मात्र एनआयएने न्यायालयाला दिलेल्या माहितीत सचिन वाझे यांचे दोन वेळा २ डी इको करण्यात आला आहे, तसेच त्याच्या रक्त चाचणी घेण्यात आली असून ते  तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच आम्ही त्याची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी देखील करीत असल्याचे एनआयए ने न्यायालयात माहिती दिली आहे. परंतु वाझे याच्या वकिलाने वाझेला २ डी इको पुरेसे नसून  अँजिओग्राफी ची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

सचिन वाझेची ६ दिवस कोठडी वाढवून मिळावी, असे एनआयएचे वकिलांनी न्यायालयाकडे विनंती केली होती, मिठी नदीतून संगणक, लॅपटॉप, हार्डडिस्क, डीव्हीआर इ. साहित्य हाती लागले असून डिसीबी बँकेत वर्सोवा शाखेत वाझेचे एका व्यक्तीसोबत  जॉईंट खाते आहे,आणि एक लॉकर देखील असून वाझेंची अटक होताच त्या खात्यातून २६ लाख रूपये काढण्यात आले असून त्यात  केवळ आता पाचच हजार रुपये शिल्लक आहे, बँकेतील लॉकर देखील हाताळण्यात आला असून, त्यात केळवळ बिनकामाची कागदपत्रे ठेवण्यात आली असून वाझे यांच्या घरी एका अनोळखी व्यक्तीचा पासपोर्ट देखील मिळून आला आहे, कुणी आपला ओरिजनल पोसपोर्ट दुसऱ्याकडे देतो का?, त्यामुळे त्यादृष्टीनंही तपास होणं आवश्यक आहे, असा एनआयएच्या वतीनं एनआयएच्या वकिलांकडून  विशेष न्यायालयात  युक्तिवाद करण्यात आला.

- Advertisement -

वाझे यांच्या वकिलांनी मात्र हे आरोप खोटे असून मिठीत सापडलेल्या वस्तू एनआयएचा बनाव असून डीसीबी बँकेतील जॉईंट खाते असल्याचा आरोपही वकील आबाद पौंडा यांनी वाझेच्या वतीनं नाकारला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू एकूण घेतल्यावर एनआयएला या प्रकरणात तपास करण्यासाठी वाझे याची ७ एप्रिल पर्यंत एनआयए कोठडीत वाढ केली आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -