घरमुंबई'जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार'

‘जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार’

Subscribe

जो मातोश्रीला पैसे पुरवणार तोच मंत्री होणार यालाच म्हणतात उध्दव ठाकरे असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांनी आता पुन्हा एकदा ट्विट केले असून, यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबत टीका केली. जो मातोश्रीला पैसे पुरवणार तोच मंत्री होणार यालाच म्हणतात उध्दव ठाकरे असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – निलेश राणेंची पुन्हा जीभ घसरली; आदित्य ठाकरेंना म्हणालेXXX


म्हणून निलेश राणे यांचे ट्विट

मुंबईला झुकते माप दिल्यामुळे ग्रामीण भागातील खासदारांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त सगळीकडे पसरल्यावर निलेश राणे यांनी याच वृत्ताचा आधार घेत शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असून, आज ते शपथ घेणार आहेत. मात्र मुंबईतील खासदारांना झुकतं माप दिल्याबद्दल शिवसेनेच्या मुंबई बाहेरील खासदारांमध्ये नाराजी पसरली आहे. ऐवढच नाही तर यामुळे एका शिवसेनेच्या खासदाराने लोकसभेतील गटनेते पदही नाकारले आहे. दरम्यान एनडीमध्ये शिवसेनेचे १८ खासदार असून, शिवसेनेच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री मिळण्याची शक्यता असून, विनायक राऊत, भावना गवळी यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र सध्या अरविंद सावंत यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, इतरांना कधी संधी मिळणार असा सवाल आता नाराज खासदारांकडून व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -