घरमुंबईनिवडणुकीत दिलेली आश्वासने केंद्रिय मंत्री गडकरी विसरले

निवडणुकीत दिलेली आश्वासने केंद्रिय मंत्री गडकरी विसरले

Subscribe

मुंबई:२०१४च्या निवडणुकीत आम्ही इतक्या मोठ्या फरकाने निवडून येऊ, अशी अजिबात शक्यता मलाच काय पक्षातील कोणाही नेत्याला वाटत नव्हती. यामुळे आश्वासने द्यायला बंधने नव्हती. मग हवी ती आश्वासने द्या, ती आश्वासने देताना किमान कंजुषी नको, अशा सूचना कार्यर्त्यांना होत्या. तेव्हा कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी खूप आश्वेसने दिली. ती काय होती, याची आता काहीही माहिती नाही, अशी कबुली देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात गडकरींनी ही कबुली दिली.

मोदींचा करिष्मा असला तरी आमच्या पैकी कोणालाच लोकांची मानसिकता ओळखता आली नव्हती. मतदार आम्हाला इतके मोठे यश देतील, असे कोणालाच वाटले नव्हते. यामुळे आश्वासने दिली तरी ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली राहणार नाही, असेच आमचे झाले होते. तेव्हा द्या आश्वासने काय बिघडते? असे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सूचना होत्या. यामुळे अक्षरश: भरमसाठ आश्वासने देण्यात आली. ती कोणती होती हे ही आता आम्हाला आठवत नाही, असे गडकरी यांनी खुलेआम म्हटले. त्यापैकी बरीच आश्वासने आता आठवतही नाहीत, तेव्हा ती पूर्ण करण्याचा विषयच संपतो, असे त्यांनी सांगून टाकले. मकरंद अनासपुरे यांच्या या कार्यक्रमात गडकरींना आश्वासनाबाबत अवगत करण्यात आले होते. तेव्हा हसतच त्यांनी हे उत्तर दिले. आश्वासनांचा पक्ष म्हणून भाजपची बोलवण होत असल्याबाबत गडकरींना बोलते केले. तेव्हा दिलेली आश्वासने इतकी आहेत की ती पूर्ण करणेही अवघड आहे, हे त्यांनी मान्य केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या यांच्या राजकारणाबाबत गडकरींना विचारले असता ते म्हणाले; शरद पवार काय बोलतील आणि काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही. मला तर ते कधीच कळले नाही. पवारांबाबत खटकणारी हीच गोष्ट असल्याचे गडकरी म्हणाले. पवार साहेबांना राजकारणात कोणीही ओळखू शकत नाही. ते कोणाला किती महत्व देतील आणि कधी त्यांना खाली आणतील, हे कोणीही सांगू शकत नाही. सर्वच बाबींचे सखोल ज्ञान ही पवारांची अत्यंत जमेची बाजू असल्यामुळे त्यांच्या अनेक कमजोर गोष्टी त्यापुढे लुप्त होतात, असे गडकरी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -