घरमुंबईयापुढे माझा जे. जे. रुग्णालयाशी कोणताही संबंध नाही; डॉ. लहानेंचे मोठे विधान

यापुढे माझा जे. जे. रुग्णालयाशी कोणताही संबंध नाही; डॉ. लहानेंचे मोठे विधान

Subscribe

माझा जे. जे. रुग्णालयाशी कोणताही संबंध नाही, असे म्हणत डॉ. तात्याराव लहाने यांनी संताप व्यक्त केला आहे. तर आमची एकही बाजू न ऐकता जे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं ते ऐकून चौकशी झाली आणि आम्ही दोषी असल्याचं वर सांगण्यात आलं, यामुळे आम्ही उद्विग्न झालो, असेही ते म्हणाले.

मुंबईतील प्रसिद्ध अशा जे. जे. रुग्णालयातील डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्यासह 9 वरिष्ठ डॉक्टरांनी काल गुरुवारी (ता. 01 मे) तडफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी कालपासून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण यासंबंधी बोलण्यासाठी आज (ता. 02 जून) डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्या सोबत राजीनाम्या दिलेल्या डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी यापुढे माझा जे. जे. रुग्णालयाशी कोणताही संबंध नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला. तर आमची एकही बाजू न ऐकता जे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं ते ऐकून चौकशी झाली आणि आम्ही दोषी असल्याचं वर सांगण्यात आलं, यामुळे आम्ही उद्विग्न झालो, आहोत असे डॉ. लहाने यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – राजीनाम्यापूर्वी डॉ. तात्याराव लहाने यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती; माजी खासदाराचा दावा

- Advertisement -

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, आमची बाजू न ऐकता चौकशी पूर्ण केली आणि आम्हाला दोषी ठरवले. 6 महिन्यांपूर्वी काही निवासी डॉक्टर रुजू झाले, रुग्ण तपासणे आणि त्यांचा इतिहास लिहिणे हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. निवासी डॉक्टरांना स्टायपंड म्हणून काम करण्यासाठी दिले जाते. विद्यार्थ्यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया शिकविल्या आहेत, ते समाधानी असल्याचे निवासी डॉक्टरांनी लिहून दिले आहे. लेक्चर किती झाले, नोट्स दिल्या याच्या नोंदी आहेत. दोन जागा रिक्त आहेत, या जागा भराव्यात याबाबत आम्ही पत्र लिहीले आहे, अशी माहिती यावेळी डॉ. लहाने यांच्याकडून देण्यात आली.

तर, जे. जे. रुग्णालय केवळ शिकवण्यासाठी नाही तर सेवेसाठी आहे, लांबून खेडेगावातून येणाऱ्या रुग्णाला सेवा देणे गरजेचे आहे. आमचे राजीनामे 31 तारखेला व्यवस्थित फॉरमॅटमध्ये दिले आहे. आता राहिलेली प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करणार आहे. आरोपांमुळे आम्ही उद्विग्न झालो असल्याने हे राजीनामे दिले असल्याचे यावेळी डॉ. लहाने यांच्याकडून सांगण्यात आले. मी मुंबईत 30 आणि आंबेजोगाई इथे 60 पिढ्या घडवल्या आहेत. एवढे शिकवल्यावर असे कोणी बोलत असेल तर यामुळे मी उद्विग्न झालो आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. लहाने यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

आमची बदनामी केली, पण गरीब रुग्ण येतात त्याला सेवेची गरज आहे. त्यांना आंधळे होताना पाहण्यापेक्षा आम्ही बाजूला होतो. आम्हाला जे. जे. रुग्णालयात जायचे नाही. या डॉक्टर प्राध्यापकांवर दबाव आहे. हा अपमान सहन करण्यापलीकडे आहे. मी विक्रमासाठी नाही तर सेवा म्हणून शस्त्रक्रिया करत आहे. आम्ही निवासी डॉक्टरांना दोषी ठरवणार नाही. विद्यार्थ्यांना काही शिकायचे असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे पण आम्ही तिकडे जाणार नाही. चांगले शिक्षक आणून त्यांना शिकवावे. पण आता जे. जे. रुग्णालय आणि आमचा संबंध संपला आहे. माझा आणि मंत्र्यांचा काहीही वाद नाही. यामागे राजकरण आहे की नाही हे मला माहीत नाही, असेही यावेळी डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -