घरमुंबईगावठाणात भागात क्लस्टर नकोच !

गावठाणात भागात क्लस्टर नकोच !

Subscribe

ठाण्यात नागरिकांचा एल्गार

क्लस्टर योजनेत गावठाण भागातील बांधकामांचा समावेश करण्यात आला. मात्र गावठाणमध्ये क्लस्टरचा समावेश करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. ठाण्याच्या बाळकुम परिसरातील हजारो नागरिकांनी गावठाण भागाच्या क्लस्टर समावेशाला रविवारी रात्री सभा घेऊन विरोध दर्शवला. कोळीवाडा भागातील रहिवाशांचाही क्लस्टरला विरोध आहे. त्यामुळे क्लस्टरविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. यानिमित्त ठाण्यात १९ जून पूर्वी गावठाणांची विशेष परिषद घेतली जाणार आहे.

- Advertisement -

नागरिकांचा विरोध

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपड्या, बेकायदा आणि धोकादायक इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी प्रशासनामार्फत समूह पुनर्विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेला गावठाण आणि कोळीवाडा भागातील रहिवाशांनी कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
पंधरवाड्यापूर्वीच ठाणे चेंदणी कोळीवाडा येथे नागरिकांनी विरोध केला होता. महापालिकेच्या स्थापनेनंतर तयार करण्यात आलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ग्रामपंचायत काळातील घरे अधिकृत करण्याबाबतचे धोरण राबविण्यात आले नाही. त्यामुळे या बांधकामांना बेकायदा असा शिक्का बसला आहे. बेकायदा ठरलेल्या या बांधकामांचा महापालिकेने समूह पुनर्विकास योजनेत समावेश केल्याने येथील नागरिकांनी विरोधाचा सूर लावला आहे. घोडबंदर भागातील कासारवडवली, मोघरपाडा, वाघबीळ, बाळकुम, कोलशेत, कोळीवाडा, भाईंदरपाडा आणि विटावा भागांतील हजारो नागरिकांनी या क्लस्टर योजनेला विरोध करण्यासाठी बाळकूम येथील श्री सोनुभाई मंदिर पटांगण येथे शेतकरी गावकरी मार्गदर्शन महासभा घेऊन जोरदार विरोध दर्शवला.

- Advertisement -

नागरिकांचे आरोप

आपले घर हजारभर चौरसफूट मोठे असते. मात्र, आपल्याला फक्त ३२२ चौरस फूट घर देण्यात येणार आहे. विकासाच्या नावाखाली आपल्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्यास सुरूवात झालेली आहे. असा आरोप यावेळी आयोजकांनी केला. लोकप्रतिनिधींना समाजाविषयी खरच आपुलकी वाटत असेल तर त्यांनी या १९ जून पूर्वी गावठाणांची एकत्रित परिषद घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -