घरमुंबईमुंबईतील 'या' भागात १२ तास पाणीपुरवठा बंद

मुंबईतील ‘या’ भागात १२ तास पाणीपुरवठा बंद

Subscribe

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईतील काही भागात १२ तास पाणी पुरवठा कमी दाबाने होणार तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार आहे.

पवईतील अँकर ब्लॉक पवई येथे तानसा (पूर्व) सागरी ब ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जल झडप तसेच पवई उच्च स्तरीय जलाशय -१ इनलेटर दुरुस्तीचे काम २३ मार्च रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भांडुपमधील काही भागात १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर धारावी येथील काही भागात ५ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, अंधेरी व धारावी या भागात किमान ५ ते ८ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा बंद होण्यापूर्वीच नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पालिका जल अभियंता खात्याने केले आहे. हे दुरुस्तीचे काम २३ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा बंद व कमी दाबाने असणारे भाग

  1. भांडुप परिसरिसरातील जय भीमनगर, बेस्ट नगर, आरे रोड परिसर, फिल्टर पाडा आदी भागात सकाळी १० ते रात्री १० असे १२ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.
  2. वांद्रे,अंधेरी, सिप्झ आदी भागात काही तास पाणीपुरवठा कमी दाबाने होणार
    अंधेरी (पूर्व) येथील चाकाला, प्रकाशवाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी, हनुमान नगर, माटा नगर, शिवाजी नगर, शाहिद भगतसिंग वसाहत, चरत सिंग वसाहत, मुकुंद हॉस्पिटल, लेलेवाडी, इंदिरा नगर,मापखान नगर, टाकपाडा, मापखान नगर, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, साग बाग, मरोळ औद्योगिक वसाहत, रामकृष्ण मंदिर रोड, जे.बी.नगर, बगरखा रोड, कांतीनगर या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच,कबिर नगर,बामणपाडा, पारशीवाडी, तरुण भारत वसाहत,इस्लाम पुरा, विमानतळ क्षेत्र, देऊळ वाडी, पी अँड टी कॉलनी या परिसरात दुपारी २ ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.त्याचप्रमाणे, विजय नगर, मिलिटरी मार्ग, वसंत ओएसिस, गावदेवी, मरोळ गाव,चर्च मार्ग, दिल व्हीव सोसायटी, कदम वाडी या परिसरात संध्याकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा बंद असणार आहे.
    तसेच, मुळगाव डोंगरी, एमआयडीसी रोड १ – २३, यशवंत नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा या परिसरात सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
    डीपी रोड, महाकाली नगर , बामण दयापाडा, इन्कम टॅक्स कॉलनी या परिसरात सकाळी ६ ते दुपारी २ या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
  3. धारावी येथील काही भागात ५ तास पाणीपुरवठा बंद
    या भागातील प्रेम नगर, नाईक नगर, धारावी लूप रोड या भागात सकाळी ४ ते दुपारी १२ या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे, धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, एकेजी नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभार वाडा, संत गोराकुंभार मार्ग या ठिकाणी दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत ५ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -