घरताज्या घडामोडीकोरोनाच्या काळात फेरीवाल्यांना विना जामीन कर्ज

कोरोनाच्या काळात फेरीवाल्यांना विना जामीन कर्ज

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या असंख्य फेरीवाले, छोट-छोटे व्यवसाय करणाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा लोकांना आर्थिक बळ देण्यासाठी प्रभात को. ऑप. क्रेडिट सोसायटीने दहा हजारपर्यंत विनाजामीन आपत्ती कर्जवाटप योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ अभ्युदयनगर, काळाचौकी, शिवडी आणि परळ विभागातील भाजी विक्रेते, छोटे दुकानदार, हातगाडीवाले, फेरिवाले यांना घेता येणार आहे.

कोरोना महामारीतून लाॅकडाऊन परिस्थिती उद्भवली. आज ती शिथील करण्यात आली असली तरी लोकांना घराच्या बाहेर पडणे अशक्य ठरले आहे. याची अधिक झळ भाजीविक्रेते, छोटे दुकानदार, हातीगाडीवाले आणि फेरीवाले यांना पोहोचली आहे. त्यामुळे त्यांची उत्पन्नाची साधन बंद झाले आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना आर्थिक चणचण भासत आहे. या गरजू लोकांनी मागणी केल्यानुसार त्यांना दहा हजार रूपयांपर्यंतचे विनाजामीन कर्ज तातडीने देण्याची योजना सुरू केली आहे, असे प्रभात पतपेढीचे माजी चेअरमन तसेच प्रमुख आधारस्तंभ राजीव काळे यांनी सांगितले.

- Advertisement -

उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद लाभत असून लोकही या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच प्रभात पतपेढीच्या या विनाजामीन आपत्ती कर्जवाटप योजनेमुळे अडचणीच्या काळात मोलाची मदत झाल्याची प्रतिक्रिया असंख्य लाभार्थ्यांनी व्यक्त केली असल्याचे प्रभात पतपेढीचे चेअरमन उमाकांत बारस्कर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -