घरमुंबईखुशखबर...रेल्वे पोलिसांना आता फक्त ८ तास ड्युटी

खुशखबर…रेल्वे पोलिसांना आता फक्त ८ तास ड्युटी

Subscribe

मुंबई रेल्वे लोहमार्ग पोलिसांना आता फक्त ८ तास ड्युटी करावी लागणार असून त्यांना त्यांच्या हक्काची साप्ताहिक सुट्टी देखील मिळणार आहे.

मुंबई रेल्वे लोहमार्ग पोलिसांना करता एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता रेल्वे पोलिसांना फक्त ८ तास ड्युटी करावी लागणार आहे. कुर्ला, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर शुक्रवारपासून सुरु करण्याचा निर्णय रेल्वे पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे. तसेच हा घेण्यात आलेला उपक्रम यशस्वी ठरल्यास येत्या महिन्याभरात उर्वरित रेल्वे पोलीस ठाण्यात देखील लागू करण्यात येणार आहे.

यासाठी घेण्यात आला निर्णय

मुंबईतील रेल्वे स्थानकात सतत होणाऱ्या चोऱ्या माऱ्या, प्रवाशांची सुरक्षा, लोकल महिला डब्यात गस्त, रेल्वे हद्दीत होणारे अपघात आणि अतिसंवेदनशील ठिकाणी पहारा, व्हीआयपी बंदोबस्त अशी विविध कामे त्यांना करावी लागतात. अशा कामांमुळे पोलिसांना सलग १२ ते १४ तास ड्युटी करावी लागते. त्यामुळे याचा परिणाम अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर होत आहे. त्यामुळे आठ तास ड्युटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

१६ तासांनी घरी परतो

तिन्ही मार्गांवर एकूण १७ रेल्वे पोलीस ठाणे असून ३ हजार ७०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच मुंबईतील विविध ठिकाणांहून कामावर येणारा पोलीस हा ड्युटीकरता सकाळी बाहेर पडला का तो १६ तासांनी घरी परतो. त्यामुळे त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. या सर्वांची दखल घेत आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांना या पुढे त्यांच्या हक्काची साप्ताहिक सुट्टी देखील मिळणार आहे.

आता आठ तास ड्युटीमुळे तीन शिफ्टमध्ये ड्युटी असणार आहे. सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत. त्यानंतर २ ते रात्री १० वाजेपर्यंत आणि रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ड्युटी असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून जेसीबीने गुलाल उधळला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -