घरमुंबई’वंचित बहुजन आघाडी’च्या सभेत ड्रोनचा वापरणार्‍या विरोधात गुन्हा

’वंचित बहुजन आघाडी’च्या सभेत ड्रोनचा वापरणार्‍या विरोधात गुन्हा

Subscribe

मुंबईत दहशतवादी हल्ल्याचे सावट असताना मुंबई पोलिसांकडून पराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल एअर मिसाईलस् मायक्रोलाईट एयर क्राफ्ट, ड्रोन इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी धुडकावून शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या ‘वंचित बहुजन आघाडी’च्या जाहीर सभेचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात निवडणुकीचे वारे सुरू असून दुसरीकडे दहशतवादीचे सावट पसरले आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांनी १९ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्याम मुंबईत पराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल एअर मिसाईलस् मायक्रोलाईट एयर क्राफ्ट, ड्रोन इत्यादींवर बंदी आणली आहे. पोलिसांकडून नागरिकांना याबाबतची सुचनाही दिली आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात ‘वंचित बहुजन आघाडी’ची शनिवारी सायंकाळी जाहीर सभा झाली. सभेसाठी आलेल्या एका कार्यकत्यार्र्ने स्वतःकडील ड्रोन कॅमेराने विनापरवाना सभेचे चित्रीकरण केले.

- Advertisement -

ड्रोन कॅमेराने चित्रीकरण केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. मात्र पोलीस ठाण्यातील एका अधिकार्‍याने गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -