घरताज्या घडामोडीमुंबई, ठाण्यात प्रत्येकी एक-एक पॉझिटिव्ह रुग्ण!

मुंबई, ठाण्यात प्रत्येकी एक-एक पॉझिटिव्ह रुग्ण!

Subscribe

सध्या जगभरात करोना व्हायरसची दहशत पसरली आहे. भारतात देखील करोना व्हायरस प्रवेश केला आहे. सध्या भारतातील करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यापैकी महाराष्ट्रातील करोना बाधितांचा आकडा १४ वर गेला आहे. पुण्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यात देखील प्रत्येकी एक-एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सहून आलेला असून मुंबईतीर रुग्ण हा दुबईहून आलेला आहे, अशी माहितील आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले

राज्यात आज तीन करोना बाधित रुग्ण आढळून आले. यातील एक रुग्ण पुणे येथील असून या ३३ वर्षीय पुरुषाने अमेरिकेला प्रवास केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील ३५ वर्षीय तरुण तसेच हिंदूजा येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला ६४ वर्षाचा पुरुष रुग्ण आज प्रयोगशाळेत तपासणीत कोरोना बाधित आढळले. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सर्व करोना बाधित रुग्णाच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरू आहे. आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत.

- Advertisement -

राज्यात बाधित भागातून एकूण ६८५ प्रवासी आले

१२ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या तीन विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इरण, इटली आणि दक्षिण कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६८५ प्रवासी आले आहेत.

५१ जण पुणे येथे तर २७ जण मुंबईत भरती

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३९९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५१ जण पुणे येथे तर २७ जण मुंबईत भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.

- Advertisement -

विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.

१२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणाऱ्या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६८५ प्रवाशांपैकी ३८३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.


हेही वाचा – विनाकारण करोनाच्या तपासणीची मागणी करू नये – राजेश टोपे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -