घरमुंबईमहिलेने दिले दोघांना 'जीव'दान

महिलेने दिले दोघांना ‘जीव’दान

Subscribe

एका महिलेच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे दोघांना जीवदान मिळाले आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हे अवयवदान पार पडलं असून मुंबईतील हे २७ वे अवयवदान असल्याचे विभागीय अवयवप्रत्यारोपण समितीकडून सांगण्यात आले आहे.

अअवयवदान श्रेष्ठ दान या उक्तीला खरे ठरतं आज एका महिलेच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे दोघांना जीवदान मिळाले आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हे अवयवदान पार पडलं असून मुंबईतील हे २७ वे अवयवदान असल्याचे विभागीय अवयवप्रत्यारोपण समितीकडून सांगण्यात आले आहे. कांता अशोक मगरे असे या महिलेचे नाव असून त्यांच्या अवयवदानामुळे दोघांना नवे आयुष्य मिळाले आहे.

ह्रदय आणि यकृत केले दान

कांता यांनी ह्रदय आणि यकृत दान केले होते. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे यकृत काश्मीरमधून मुंबईत उपचारांसाठी आलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला देण्यात आले. त्यांच्यावर सध्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

अपघातामुळे झाला मृत्यू

औरंगाबादवरुन ठाण्याला घरी येत होत्या. पडघा- भिवंडीरोडजवळ रस्ता ओलांडताना त्यांना टेम्पोची धडक बसली. त्यांना तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार नीट होत नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याठिकाणी स्कॅनिंगची सुविधा नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे स्कॅनिंगची सुविधा नसल्याने त्यांना नवपाडा इथल्या ज्युपिटर स्कॅन सेंटरमध्ये नेण्यात आले. स्कॅन केल्यानंतर अखेर त्यांना वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर ४ दिवस उपचार सुरु होते. पण चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर अवयवदानासाठी त्यांना ज्युपिटरमध्ये दाखल केले, अशी माहिती कांता यांचे नातेवाईक नितीन पोटफोडे यांनी दिली.

” मुंबईतील हे २७ वे अवयवदान आहे. महिलेचे हदय आणि यकृत दान करण्यात आले. ह्रदय फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आले असून झेडटीसीसीच्या नियमावलीनुसार यकृत ज्युपिटर रुग्णालयातील एका गरजू व्यक्तीला दान करण्यात आलं. ”
-अनिरुद्ध कुलकर्णी, समन्वयक, अवयव प्रत्यारोपण समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -