घरमुंबईखबरदार! जास्त पैसे आकारणाऱ्या रक्तपेढींवर FDAची नजर

खबरदार! जास्त पैसे आकारणाऱ्या रक्तपेढींवर FDAची नजर

Subscribe

ओव्हरचार्ज करणाऱ्या रक्तपेढ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जास्त पैसे आकारणाऱ्या रक्तपेढींवर सध्या FDAची नजर आहे.

ओव्हरचार्ज या शब्दानं आता मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये देखील शिरकाव केला आहे. मुंबईतील मोठमोठ्या रक्तपेढ्यांमध्ये काही मार्गदर्शक तत्वे आखून दिली गेली आहेत. मात्र, त्यांना देखील धाब्यावर बसवले जात असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. रक्त दर ते रक्त तपासणी दरांमध्ये सावळा गोंधळ आहे. दरम्यान अनेक रक्तपेढ्यांमध्ये गरजूंना सवलत दिली जात नसल्याची माहिती RTIमधून समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य आणि औषध प्रशासन राज्यातील ३०६ रक्तपेढ्यांची पाहणी केली जाणार आहे. अनेक रक्तपेढ्यांमद्ये रक्तासाठी जास्त पैसे आकारले जातात. परिणामी या रक्तपेढ्यांची पाहणी करण्याचा निर्णय FDAनं घेतला आहे. यावेळी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होते का? हे पाहिले जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सरकारी रक्तपेढींसाठी सुधारित एनबीटीसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संपूर्ण रक्ताच्या पिशवीची किंमत ही प्रति युनिट ४५० रुपये एवढी आहे. पूर्वी रूग्णांना १,०५० रुपये मोजावे लागत होते. तर, पॅक सेल्स म्हणजेच पॅक केलेल्या लाल पेशींची किंमत आता ४५० रुपये एवढी करण्यात आली. तर, या आधी याची किंमत १,०५० एवढी होती. धर्मादाय आणि खासगी रक्तपेढींसाठी देखील सुधारीत एनबीटीसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, १,४५० रुपये प्रति युनिट रक्त द्यावं लागणार आहे. याआधी ८५० रुपये प्रति युनिट हे शुल्क आकारलं जायचं. तर, पॅक सेल्स म्हणजेच पॅक केलेल्या लाल पेशींची किंमत आता १,४५० रुपये एवढी करण्यात आली. तर, या आधी याची किंमत ८५० एवढी होती.

- Advertisement -

रक्तपेढ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती

नोव्हेंबर २०१४मध्ये FDAच्या अधिकाऱ्यांना ७२ रक्तपेढ्यांच्या नियमांमध्ये विसंगती आढळून आली होती. पैकी १९ रक्तपेढ्या या मुंबईतील होत्या. त्यामुळे अन्न आणि औषध पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. ज्याद्वारे नियमांचे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर लक्ष ठेवण्यात आले.

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी रक्तपेढीतील दरांची माहिती मागवली होती. त्यामध्ये हिंदूजा, एच. एन, कोकीलाबेन धीरुबाई अंबानी, होली फॅमिली, नानावटी रक्तपेढी, होली फॅमिली हॉस्पिटल, बीडी पेटीट हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल रक्तपेढी, फोर्टीस हॉस्पिटल रक्तपेढी, हिंदुजा हॉस्पिटल रक्तपेढी अशा बहुतांश रक्तपेढ्यांमधील रक्त दरांबाबत साशंकता उपस्थित करण्यात आली आहे. शिवाय, कित्येक रक्तपेढ्यांमधील रक्त दर हे दुप्पट आकारले जात असल्याचंही माहिती अधिकारातून स्पष्ट झालं आहे. बहुतांश रक्तपेढ्यांवर परवाना रद्द करणे, दंड वसुली, आगाऊ रक्कम आदी कारवाया करणं बाकी असून याला प्राधाान्य देणं गरजेचं असल्याचं चेतन कोठारी यांनी सांगितलं.

- Advertisement -

“रक्तपेढ्यांची तपासणी करण्याचा प्रस्ताव आहे. ज्या रक्तपेढ्या ओव्हरचार्ज करतात. त्यांचं इन्स्पेक्शन केलं जाणार आहे. रक्तपेढ्यांचे नेमके किती दर आहेत? याचा बोर्ड प्रथमदर्शनी जागेत लावण्याचे आदेश रक्तपेढ्यांना दिले आहेत. म्हणजे लोकांनाही रक्ताच्या दरांबाबत माहिती मिळेल. या तपासणीत ज्या ओव्हरचार्ज करणाऱ्या रक्तपेढ्या आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. शिवाय, याबाबतची नोटीस सर्वांना दिली आहे. त्यामुळे जो दोषी आढळेल त्यांच्यावर कशाप्रकारची कारवाई करायची याचा निर्णय घेण्यात येईल.”

डॉ. अरुण थोरात, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -