घरठाणे‘सबसे कातील, गौतमी पाटील’चा बदलापूरमध्ये धुमाकूळ, ‘छप्परफाड’ गर्दी…

‘सबसे कातील, गौतमी पाटील’चा बदलापूरमध्ये धुमाकूळ, ‘छप्परफाड’ गर्दी…

Subscribe

महाराष्ट्रातील तरूणांची ‘सबसे कातील, गौतमी पाटील’ची अदा पाहून बदलापूरकरही घायाळ झाले. बदलापूरमध्ये एका पठ्ठ्यानं तर आपल्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या क्रिकेट चषकासाठी चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला.

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या क्रेझची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम असतो तिथे मात्र पोलिसांना अधिक काम लागतं. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम नेहमीच हाऊसफुल्ल असतो. तिच्या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड झुंबड उडते. त्यामुळे तिचे राज्यभरात कार्यक्रम होत असतात. सार्वजनिक मंडळांकडून तिच्या कार्यक्रमाला मोठी मागणी असते. हल्ली तर वाढदिवसाच्या निमित्तानेही लोक गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवत आहेत. त्यामुळे गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं. हेच चित्र आता बदलापूरकरांना अनुभवता आलं.

महाराष्ट्रातील तरूणांची ‘सबसे कातील, गौतमी पाटील’ची अदा पाहून बदलापूरकरही घायाळ झाले. बदलापूरमध्ये एका पठ्ठ्यानं तर आपल्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या क्रिकेट चषकासाठी चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला. मग काय गावात चर्चा होणार आणि विषय रंगणार.. या कार्यक्रमासाठी एका केंद्रीय मंत्र्याने सुद्धा हजेरी लावली होती.
प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करताना दिसते. त्यात एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस असला की मग काहीतरी स्पेशल असायलाच हवं. शिवसेना बदलापूर उप शहरप्रमुख मंगेश धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त खरवई इथल्या मैदानावर हिंदुहृदय सम्राट क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतमी पाटील देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी गौतमी पाटीलने तिच्या अदाकारीने बदलापूरकरांना घायाळ केले. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातील नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती.

- Advertisement -

यावेळी गौतमीनं चंद्रा, पांडू चित्रपटातील भूरूम भूरूम, सरकार तुम्ही केलंय ट्राफिक जाम यासारख्या गाण्यावर दिलखुलास डान्स केला. डान्स करताना गौतमीने केलेल्या अदाकारीने बदलापूरकरांना चांगलंच घायाळ केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या गौतमीचा ‘घुंगरू’ चित्रपट येणारेय. याबाबत गौतमीला विचारले असता, डान्स करण्यापेक्षा अभिनय कठीण असतो असे मत तिने माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.

खरवई मैदानावर आयोजित केलेला गौतमीचा शो पाहण्यासाठी सायंकाळी ६ वाजल्यावापासून प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरवात केली होती. बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक तरुण गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी खरवईत आले होते. याच कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सह बदलापूर शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक, पडदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -