घरमुंबईपरळमध्ये घड्याळाच्या गोडाऊनला लागलेली आग विझली

परळमध्ये घड्याळाच्या गोडाऊनला लागलेली आग विझली

Subscribe

परळमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली होती. प्रिमियर टॉकीजजवळ इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या घड्याळ्याच्या गोडाऊनला आग लागली होती. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

परळमध्ये आग्नितांडव सुरुच आहे. परळमध्ये गोडाऊनला लागलेली भीषण आग विझवण्यात यश आले आहे. प्रिमियर टॉकीजजवळ इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या घडाळ्याच्या गोडाऊनला आग लागली होती. फायर ब्रिगेडच्या चार फायर इंजिन आणि दोन वॉटर टँकरच्या सहाय्याने आग विझवण्यात आली आहे. मात्र या आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधील रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आले होते. मागच्या आठवड्यातच परळच्या क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर आग लागली होती. या आगीमध्ये ४ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -