घरमनोरंजनवांद्र्यातील चौकाला 'या' अभिनेत्याचे नाव!

वांद्र्यातील चौकाला ‘या’ अभिनेत्याचे नाव!

Subscribe

मुंबईच्या वांद्रे येथील एका चौकाला अभिनेते प्राण यांचे नाव देण्यात आले आहे,

चित्रपटातल्या मुख्य भूमिका निभावणारे हिरो-हिरोईन सगळयांनाच माहिती असतात. पण ज्या अभिनेत्याने आपल्या खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली, असे दिवंगत अभिनेते प्राण. प्राण यांनी आपल्या ताकदीच्या अभिनयाच्या जोरावर अनेक खलनायकी भूमिका वठवल्या. अशा प्राण यांचे मुंबईतील एका चौकाला नाव देण्यात आले आहे. मुंबईच्या वांद्रे येथील एका चौकाला प्राण यांचे नाव दिले आहे. या नामकरण सोहळ्याला अभिनेता जॅकी श्रॉफ उपस्थित होते.

जॅकी श्रॉफ यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत याचा आनंद व्यक्त केला.

Honored to be at naming ceremony of pran saab marg in bandra

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on

- Advertisement -

प्राण यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत ७०हून अधिक वर्षांत ४००हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात इ.स. १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -