घरमुंबईकल्याणमध्ये सेंट मेरी शाळेविरोधात पालकांचे आंदोलन

कल्याणमध्ये सेंट मेरी शाळेविरोधात पालकांचे आंदोलन

Subscribe

अवास्तव फी वाढ आणि विशिष्ट पुस्तक घेण्याचा शाळेचा आग्रह यावरून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होत असलेली मारहाण या निषेधार्थ संतप्त पालकांनी कल्याणमधील सेंट मेरी शाळेविरोधात आंदोलन करत शाळा बंद पाडली.

अवास्तव फी वाढ आणि विशिष्ट पुस्तक घेण्याचा शाळेचा आग्रह यावरून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होत असलेली मारहाण या निषेधार्थ आज, बुधवारी संतप्त पालकांनी कल्याणमधील सेंट मेरी शाळेविरोधात आंदोलन करत शाळा बंद पाडली. दोन विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पालकांनी शाळेविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पालकांनी शाळा बंद पाडली 

कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका परिसरात सेंट मेरी शाळा आहे. शाळेतील अवास्तव फी वाढीविरोधात अनेक दिवसांपासून पालक झगडत आहेत. मात्र शाळा व्यवस्थापनाकडून कोणतीही दाद दिली जात नाही. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शाळेने सांगितलेली पुस्तक आणण्याचा आग्रह केला जात आहे. ती पुस्तकं आणली नाही म्हणून शाळेच्या शिक्षकांनी दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून त्यांना गुडघ्यावर बसण्याची शिक्षा केली. त्या विरोधात पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षा करण्यात आलेले विद्यार्थी भयभित झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाविषयी पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पहिली ते पाचवीच्या पुस्ताकांची फी अडीच हजार रूपये असताना साडेसात हजार रूपये घेतली जात आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या कोणत्याही शाळेत ही किंमत घेतली जात नाही, असे पालकांनी सांगितले. महाराष्ट्र बोर्डाकडून संगणकाच्या पुस्तकाची किंमत ८० रूपये आहे. मात्र शाळेकडून ७०० ते ८०० रूपये घेतले जातात, असे पालकांनी सांगितले. जोपर्यंत अवास्तव फी कमी केली जात नाही, मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा आणि विशिष्ठ पुस्तक घेण्याचा आग्रह याविषयी कोणताही निर्णय होत नाही. तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडू देणार नाही, असा इशाराही पालकांनी यावेळी दिला.

- Advertisement -

हेही वाचा –

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकराचे प्रेयसीवर धारदारशस्त्राने वार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -