घरमुंबईबोगस लॅब्सविरोधात सरकारला पॅथॉलॉजिस्टचं अल्टिमेटम!

बोगस लॅब्सविरोधात सरकारला पॅथॉलॉजिस्टचं अल्टिमेटम!

Subscribe

राज्यभरात ७० ते ८० टक्के बेकायदेशीर लॅबोरेटरी आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होतो.

पॅथलॅबमध्ये रक्ततपासणीसाठी गेलात तर अनेकदा पॅथॉलॉजिस्ट नाही तर तिथला टेक्निशियन सही करतो अशा तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत. शिवाय, राज्यभरात ७० ते ८० टक्के बेकायदेशीर लॅबोरेटरी आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे गेली १३ वर्षे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रक्टिंसिंग पॅथोलॉजिस्ट अॅंड मायक्रोबायोलॉजिस्ट ही संघटना कार्यरत आहेत. सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करुन बोगस टेक्निशियन्स आणि बेकायदेशीर लॅबविरोधात काढलेला जीआर आणि कायद्या योग्य पद्धतीने अंमलात आणावा यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रक्टिंसिंग पॅथोलॉजिस्ट अॅड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा – फॉरेन्सिक लॅब सहाय्यकांनाही ग्रामीण भागाची सेवा सक्ती

- Advertisement -

राज्यात १० हजारांपेक्षा जास्त बोगस पॅथलॅब्स

तसच, जर यावर लवकरात लवकर निर्णय घेतला गेला नाही तर जानेवारी महिन्यात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला जाणार असल्याचं या संघटनेकडून निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसह राज्यात सध्या १० हजारांपेक्षा जास्त बोगस पॅथलॅब्स आहेत. जिथे, टेक्निशियनच अख्खी लॅब चालवतो. तसंच, एकच डॉक्टर ३ ते ४ वेगवेगळ्या लॅबमध्ये न जाता ही सह्या करतो. त्यामुळे खरा पॅथॉलॉजिस्ट पॅथलॅबमध्ये कधी उपलब्ध असतो हे ही लोकांना कळत नाही. लॅबमध्ये मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट असणं सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले असतानाही मुंबईतील बहुतांश लॅबमध्ये तंत्रज्ञांच्या जीवावर रुग्णांना चुकीचा रिपोर्ट दिला जातो. अशातून रुग्णांवर होणारे उपचारही चुकीच्या पद्धतीने केले जातात. त्यामुळे रुग्णांच्या रिपोर्टचे चुकीचे निदान आणि त्यांवर चुकीचे उपचार होतात. त्यातून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातो.

महाराष्ट्रात एकूण चार हजार पॅथॉलॉजिस्ट आहेत. ही संख्या शहरात आणि ग्रामीण भागात अपुरी आहे. त्यामुळे अनेकदा फक्त टेक्निशियनच ग्रामीण भागात रिपोर्ट्स देतात. त्यातून आतापर्यंत अनेक चुकीच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. शिवाय, या पोस्टसाठी मुंबईतून किमान ५० रिक्त जागा आहेत. पण, बोगस टेक्निशियन्स आणि बेकायदेशीर लॅब्सचा सुरू असलेल्या सुळसुळाटामुळे या रिक्त जागा भरल्या जात नसल्याचं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पोहोचल्या आहेत पण आजही चाचण्या टेक्निशिअन कडूनच केल्या जातात. अनेक जागा ही रिकाम्या आहेत. त्यामुळे २०२८ पर्यंत चौपट पटीने टेक्निशियनची संख्या वाढेल. नाशिक मध्ये ३१८ लॅब्स बेकायदेशीर आहेत. तरीही त्या सुरू आहेत. या बेकायदेशीर लॅबोरेटरीस अवैध असून त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रुग्णांना योग्य सुविंधांपासून दूर ठेवलं जातं. नेहमीच मशीनचे रिडींग बरोबर असतीलच असं नाही. त्यासाठी पॅथॉलॉजिस्ट लॅब्समध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींना जे काम येत नाही ते काम त्यांनी करु नये. टाटा हॉस्पिटलमध्ये ही पॅथॉलॉजिस्टकडून रिपोर्ट दिले जात नाही. त्यामुळे, फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरात ही खूप मोठी साखळी आहे. तक्रारी केल्यानंतर काही प्रकरणं समोर आली. त्यानुसार, काही टेक्निशियनन्सवर कारवाई देखील केली गेली आहे. पण, शासनाकडून एक जीआर काढला गेला पाहिजे. त्यानंतर तात्काळ ७० टक्के हून अधिक बेकायदेशीर लॅब्स बंद होतील. यासाठी २७ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. तरीही शासनाकडून काही कारवाई केली गेली नाही तर जानेवारी महिन्यात उपोषणाला बसणार आहोत.

-डॉ. संदीप‌‌ यादव‌, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रक्टिंसिंग पॅथोलॉजिस्ट अॅड मायक्रोबायोलॉजिस्ट

रुग्णांवर होणारे परिणाम

  • बेकायदेशीर लॅबोरेटरीमुळे रुग्णांना चुकीचे रिपोर्ट मिळतात, चुकीचे निदान होते किंवा योग्य निदानास विलंब होतो. त्यामुळे, चुकीचे आणि उशिरा उपचार होतात.
  • कधी कधी किरकोळ आजार आणि त्यातून बरे होणार्या रुग्णांनाही विनाकारण जीव गमवावा लागतो.
  • अनावश्यक तपासण्या , रुग्णांना अॅडमिट करुन घेणे, त्यासोबतच, हॉस्पिटलशी संलग्न लॅब म्हणजे डॉक्टर स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये लॅबोरेटरी तंत्रज्ञाच्या सहाय्याने लॅबोरेटरी चालू करतात. येथे चाचण्या करणे, रिपोर्ट तयार करणे ही सर्व काम तंत्रज्ञ करतात. या सर्वाचा परिणाम फक्त नी फक्त जनतेच्या आरोग्यावर होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -