घरमुंबईसावरकरांचा अपमान करणाऱ्याला जनता धडा शिकवेल; मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींना टोला

सावरकरांचा अपमान करणाऱ्याला जनता धडा शिकवेल; मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींना टोला

Subscribe

देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सावरकरांसोबत अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली आणि त्यांचा अपमान करणे हे चुकीचे आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेत आहेत. या यात्रेला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. अशातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आणि त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. उद्या 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे त्या निमित्ताने स्मृतीदिनाच्या पूर्व संध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

या परिसंवादात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असं सावरकर नेहमी म्हणायचे आणि हाच मंत्र सावरकरांनी जपला त्याचसोबत बाळासाहेब सुद्धा त्यांच्या कृतीतून हे दाखवायचे. सावरकरांनी हाल अपेष्टा सहन केल्या. काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अश्या स्वातंत्र्य सेनानींचा आणि सावरकरांचा वेळोवेळी अपमान करण्याचे काम जो कोणी करत असेल त्याला राज्यातील आणि देशातील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधींना नाव न घेता टोला लगावला आहे.

- Advertisement -

याच संदर्भांत बोलताना शिंदे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सावरकरांसोबत अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली आणि त्यांचा अपमान करणे हे चुकीचे आहे. या देशासाठी स्वातंत्र्य वीरांचे जे विचार होते. ते विचार बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्यक्षात आचरणात आणले. गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी बुलंद केला. त्याचसोबत 370 कलम हटविणे आणि राम मंदिर निमार्ण करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते ते स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मणिशंकर अय्यर यांनी जेव्हा सावरकर यांच्या विरोधात भूमिका घेतली तेव्हा त्याचा निषेध म्हणून जोडो मारो आंदोलन केले. त्यामुळेच आम्ही सावरकरांचा झालेला अपमान सहन करू शकत नाही. त्याचसोबत मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही बंड नाही तर क्रांती आणि उठाव केला. वेडात मराठे वीर दौडले सात या गाण्याची आठवण करून देत मुख्यमंत्री म्हणाले वेडेच इतिहास घडवतात. ते सात होते आणि आम्ही पन्नास आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘स’ माहीत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -