घरमुंबई कचरा विल्हेवाटीसाठी आता प्लाझा तंत्रज्ञान

 कचरा विल्हेवाटीसाठी आता प्लाझा तंत्रज्ञान

Subscribe

आता कचरा विल्हेवाटीसाठी प्लाज्मा तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. पुणे महापालिेकेत हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. सुमारे ७५ कोटी खर्चाचा हा प्रकल्प आहे. या पालिकेकडून प्रत्येकी शंभर टनाचे तीन प्रकल्प उभारले जाणार आहे.

शहरातील घनकच-याची समस्या गंभीर बनत चालली असल्याने ती सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून विविध तंत्रज्ञान आणि उपाययोजना आखले जात असतानाच, आता कचरा विल्हेवाटीसाठी प्लाज्मा तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. पुणे महापालिेकेत हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. सुमारे ७५ कोटी खर्चाचा हा प्रकल्प आहे. या पालिकेकडून प्रत्येकी शंभर टनाचे तीन प्रकल्प उभारले जाणार आहे. त्यामुळे प्लाज्मा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दररोज सुमारे तीनशे टन कच-याची विल्हेवाट लावली जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ९५० मेट्रीक टन इतका कचरा निर्माण हेातो. गेल्या अनेक वर्षापासून महापालिका क्षेत्रातील कचरा हा दिवा येथील कचराभूमीवर टाकला जातो. या कचराभूमीला सातत्याने आग लागल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे निर्माण होणा- या धुरांमुळे दिवावासियांना व आजूबाजूच्या रहिवाशांना खूपच त्रास सहन करावा लागतो. ठाणे महापालिका क्षेत्रातील जुन्या कचराभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच डायघर येथे कच-यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मोठया गृहनिर्माण सेासायटयांनाही पालिकेने चाप लावला आहे. ज्या गृहनिर्माण सोसायटया मॉल तसेच हॉस्पिटलचा दररेाजचा कचरा १ हजार किलो पेक्षा जास्त निर्माण होतो तसेच ज्या सोसायटयांचे क्षेत्रफळ ५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे अशा सोसायटयांना स्वत:च कच- याची विल्हेवाट लावण्याचे ठाणे महापालिकेने बंधनकारक केले होते. त्यासाठी सुमारे १ हजारपेक्षा अधिक सोसायटींना पालिकेने नोटीसही बजावल्या होत्या. मात्र सोसायटयांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने त्यांचा कचरा उचलणे बंद केले होते. मात्र सोसायटयांनी सदर प्रकल्पासाठी मुदत मिळावी अशी मागणी करीत अधिवेशन काळात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं साकडं घातलं होत. त्यामुळे पालकमंत्रयाच्या आदेशानंतर काही दिवस सोसायटयांना दिलासा मिळाला आहे. मात्र लहान सेासायटी व झोपडपट्टीमध्ये कचरा विल्हेवाट लावला जाऊ शकत नाही त्यामुळे इथला ओला व सुका कचरा गेाळा करण्यासाठी पालिकेने बचतगट व सामाजिक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. त्यावर अजूनही पालिकेने निर्णय घेतलेला नाही. त्यांच्याकडून हा कचरा गोळा करून पालिकेच्या विविध तंत्रज्ञानात विल्हेवाट लावण्याचा पालिकेचा विचार आहे.

- Advertisement -

काय आहे प्लाज्मा तंत्रज्ञान

एक मोठा बॉयलर असतो. त्या बॉलरमध्ये सुमारे १४०० ते १५०० डिग्रीपर्यंत उष्णता निर्माण केली जाते. साधारण १०० टन कचरा मावेल इतका मोठा बॉयलर असतो. त्या बॉयलरमध्ये कचरा टाकल्यानंतर हिटमुळे कच- याची पूर्ण राख होेते. त्यातून निर्माण होणा- या गॅसेसवर विषारी वायूंवर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करून हवेत सोडले जाते. हे तंत्रज्ञान अवघ्या काही तासात कच-याची राख करते. तसेच कचरा वेगळा करण्याची गरज नाही. मिश्र कच- याची विल्हेवाट लावली जाते.

कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून विविध तंत्रज्ञानाच्या साहययाने प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे कच- याची चांगल्याप्रकारे विल्हेवाट लावली जात आहे. मोठ मोठी गृहसंकुलेही आता स्वत:च्या कच- याची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करीत आहेत. साधनसामुग्रीसाठी अथवा सेटअप उभारण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर गृहसंकुले स्वत: कच- याची विल्हेवाट लावणार आहेत. सुमारे आठशेच्या आसपास ही गृहसंकुले आहेत. झोपडपट्टी व रहिवाश क्षेत्रातील कचराही बचत गट अथवा खासगी संस्थामार्फत गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ऑक्टेाबर २०१९ पर्यंत कच- याची समस्या संपुष्टात येईल.

- Advertisement -

-अशोक बूरपल्ले, उपायुक्त घनकचरा प्रकल्प

पुणे महापालिकेत हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. ठाणे महापालिकेत हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी पावले उचलली आहेत.पालिकेकडून प्रत्येकी शंभर टनाचे तीन प्रकल्प उभारले जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदाही प्रसिध्द केली. मात्र पहिल्या निविदेला कंत्राटदाराकडून रिस्पॉन्स मिळालेला नाही, त्यामुळे पालिकेने फेर निविदा मागवली आहे.

-डॉ बाळाजी हळदेकर, घनकचरा प्रमुख


-संतोष गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -