घरदेश-विदेशवादग्रस्त वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याविरोधात पोलीस तक्रार

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याविरोधात पोलीस तक्रार

Subscribe

हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी धारदार चाकू घरात ठेवावा. आपल्या घरात शस्त्रे ठेवावीत. हिंदूंनाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. बाकी काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुऱ्या तरी धारदार ठेवाच, असा सल्ला खासदार साध्वी यांनी दिला.

नवी दिल्लीः वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याविरोधात कर्नाटक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. हिंदुंनी घरात धारधार शस्त्र ठेवावीत, असे वक्तव्य खासदार साध्वी यांनी केले होते.

कर्नाटकमधील कार्यक्रमात खासदार साध्वी यांनी हे वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या,  जिहाद पसरवणारे लोक शस्त्र उचलू शकतात, तर हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रं ठेवू शकत नाहीत का?, असे वक्तव्य त्यांनी केले. प्रत्येकाला स्वरक्षणाचा अधिकार आहे. त्यांच्याकडे जिहाज आहे. लव्ह जिहाद. त्यांना काहीच जमलं नाही तर ते लव्ह जिहाद करतात. ते प्रेम करतात, पण त्यामध्ये जिहाद असतो. आपण पण प्रेम करतो. मात्र आपण परमेश्वरावर प्रेम करतो. सन्यासी भगवंतावर प्रेम करतो, असे खासदार साध्वी म्हणाल्या होत्या.

- Advertisement -

हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी धारदार चाकू घरात ठेवावा. आपल्या घरात शस्त्रे ठेवावीत. हिंदूंनाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. बाकी काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुऱ्या तरी धारदार ठेवाच, असा सल्ला खासदार साध्वी यांनी दिला.

खासदार साध्वी पुढे म्हणाल्या, परमेश्वराने बनवलेल्या या जगतातील प्रत्येक अन्याय व अन्याय करणाऱ्यांना संपवले पाहिजे अन्यथा सत्य जिवंत राहणार नाही. त्यामुळे लव्ह जिहाद करणाऱ्यांना जसाच तसे उत्तर द्या. आपल्या मुलींचे रक्षण करा, असे आवाहन खासदार साध्वी यांनी केले.

- Advertisement -

खासदार साध्वी यांच्या वक्तव्यावरुन एकच वादंग निर्माण झाले होते. या वक्तव्यावर टीकाही झाली होती. खासदार साध्वी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही होत होती. अखरे त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली.

मालेगाव बाॅम्बस्फोटात साध्वी यांना अटक झाली होती. हिंदू दहशतवादी असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात साध्वी यांना कर्करोग झाला होता. त्यावरील उपचारासाठी त्यांनी जामीन मागितला होता. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकरला. नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. भाजपच्या तिकिटावर त्या खासदार म्हणून निवडून आल्या. वादग्रस्त विधानांमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -