घरमुंबईआता हवालदार नाही, 'या' नावाने बोलवावं लागेल पोलिसांना!

आता हवालदार नाही, ‘या’ नावाने बोलवावं लागेल पोलिसांना!

Subscribe

पोलीस शिपाई ते हवालदार यांचा उल्लेख कर्मचारी असा न करता ‘पोलीस अंमलदार’ असा करण्यात यावा असं परिपत्रक राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांसाठी काढण्यात आलं आहे. कर्मचारी या शब्दापेक्षा अंमलदार या शब्दात वेगळेच वजन असल्यामुळे कार्यालयीन कामासाठी अंमलदार या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात यावा यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

राज्य पोलीस दलात काम करणारे पोलीस शिपाई पासून पोलीस हवालदार तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा सरसकट उल्लेख पोलीस कर्मचारी असा करण्यात येत होता. कार्यालयीन कागदोपत्री देखील पोलीस कर्मचारी असाच उल्लेख होत असल्यामुळे कर्मचारी हा कुठलाही असू शकतो. परंतु पोलीस म्हटले कि सर्वांच्या समोर रुबाबदार आणि कायद्याचा रक्षक म्हणून छबी उभी राहाते. तसेच पोलीस खात्यात येण्यापूर्वी पोलीस शिपाई हा खडतर प्रशिक्षण घेऊन आलेला असतो. त्याच्याकडे कायद्याचे ज्ञान असते, कायद्याची अंमलबाजवणी करण्याचे अधिकार त्याला देण्यात आलेले असतात. यामुळे पोलीस कर्मचारी या शब्दात कुठलाही रुबाब दिसून येत नाही, मात्र अंमलदार या शब्दात वेगळेच वजन वाटते. त्यामुळे हा शब्द पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी योग्य शब्द असल्यामुळे या पुढे पोलीस अंमलदार हाच शब्दप्रयोग सर्व पोलीस कार्यालयांकडून करण्यात यावा, यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -