घरमुंबईदुधात भेसळ करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा, गोकुळ आणि अमूलचे 60 हजार 600...

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा, गोकुळ आणि अमूलचे 60 हजार 600 किमतीचे दूध जप्त

Subscribe

मुंबई – शहरामध्ये नामांकित कंपनीच्या दुधामध्ये अशुद्ध पाणी भरून भेसळयुक्च दुधाची विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सी बी कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखेने 6 जणांना अटक केली आहे. ही कारवाई शाहूनगर, धारावी या परिसरात करण्यात आली.यात 1 हजार 10 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या भेसळयुक्त दुधाची किंमत 60 हजार 600 इतकी आहे.

पोलिसांनी मुंबई शहरात चालू असलेल्या बेकायदेशीर व अवैद्य धंदयावर बेधडक कारवाई केली. शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए. के. गोपाळनगर येथे झोपडपट्टीत काही घरांमध्ये गोकुळ, अमूल, या नामांकित कंपनीच्या दुधात अशुध्द पाणी भरून नागरीकांना विक्री करीत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली होती.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी गुरुवारी ए. के. गोपाळनगर, संत कबीर मार्ग, 60 फिट रोड, धारावी येथे सी. बी कट्रोल, आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांनी एकून 06 वेगवेगळ्या पथकाद्वारे छापा टाकला. या छाप्यात दुधाच्या भरलेल्या पिशव्या व अस्वच्छ वापरलेल्या रिकाम्या पिशव्या तसेच भेसळयुक्त दुधाने भरलेल्या प्लॅस्टीकच्या बादल्या, पेटत्या मेणबत्त्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टीकचे नरसाळे इ. साहित्य मिळाले. . त्यापैकी काही पिशव्या हातात घेवून त्याची पाहणी केली असता, त्या पिशवीचे कोपऱ्यावर असलेल्या सीलच्या ठिकाणी कापलेल्या दिसून आल्या. त्यात अशुध्द पाणी भरून दूधात भेसळ करीत असल्याचे समोर आले.

कारवाई दरम्यान घरामध्ये गोकुळ, अमूल या नामांकित कंपनीचे 60 हजार 600 रुपये किंमतीचे एकूण एक हजार 10 लिटर भेसळयुक्त दूध मिळाले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनाम्याअंतर्गत परिक्षणासाठी नमुने घेण्यात आले असून छापा कारवाईमध्ये एकूण 06 जणांना अटक करण्यात आले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -