घरमुंबईपोलिसांची फिल्मीस्टाईल कारवाई

पोलिसांची फिल्मीस्टाईल कारवाई

Subscribe

ताडदेव वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद पद्मन ड्युटीवर असताना अचानक एका गाडीतून काही लोक ओरडून मदत मागत असल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला.दोन व्याप्यार्‍यांचे अपहरण करण्यात येत होते. पण पोलिसांच्या तत्परतेने हा कट उधळला.

गावदेवी पोलीस आणि ताडदेव वाहतूक पोलिसांनी केलेल्या फिल्मीस्टाईल कारवाईत डायमंड मार्केटमधून अपहरण होत असलेल्या दोन व्यापार्‍यांची सुखरूप सुटका झाली. पैसे देताना मध्यस्थी राहणार्‍या दोन व्याप्यार्‍यांचे अपहरण करण्यात येत होते. पण पोलिसांच्या तत्परतेने हा कट उधळला.

नेहमीप्रमाणे गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष जगदाळे आणि इथापे आपली ड्युटी बजावत होते. ताडदेव वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद पद्मन ड्युटीवर असताना अचानक एका गाडीतून काही लोक ओरडून मदत मागत असल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. काही तरी गडबड आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला तात्काळ माहिती दिली. गावदेवी परिसरात गाडी नंबर इमएच-०२ बिडी- ५३५३ मधून दोन व्यापार्‍यांचे अपहरण करण्यात येत होते.

- Advertisement -

हवालदार प्रमोद पद्मन यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जगदाळे आणि इथापे यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. पेडररोडवरील करमायकल जंक्शन या ठिकाणी आरोपींची गाडी अडवून त्यांना बेड्या ठोकल्या. यामध्ये राजकोटच्या व्यापार्‍यासह चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजस्थान येथील राजकोटमध्ये राहणार्‍या व्यापारी शबीर खान याने डायमंड मार्केटमधील एका व्यापार्‍याला १० लाख रुपये उसणे दिले होते. त्यापैकी ६ लाख रुपये व्यापार्‍याने खान याला परत केले होते. उर्वरित ४ लाख रुपये परत करण्यास व्यापार्‍याकडून टाळाटाळ होत होती. त्यामुळे संतापलेल्या खान याने पैसे देताना मध्यस्ती राहिलेल्या २ व्यापार्‍यांचे अपहरण केले. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे अपहरण टळले.

- Advertisement -

मंगळवारी आम्ही नेहमीप्रमाणे व्हॅन क्रमांक दोन मधून कामावर असताना आम्हाला अचानक पोलीस कंट्रोल रूमवरून फोन आला की, एका गाडीतून काही जणांचे अपहरण होत आहे. मदतीसाठी ते लोक ओरडत असल्याने त्यांच्या गाडीला गाठण्याचे आदेश आम्हाला वरिष्ठांकडून मिळाले. त्यानुसार मी आणि माझा सहकारी इथापे यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. अखेर करमायकल जंक्शन परिसरात आम्ही त्यांना गाठले. चौकशी दरम्यान पैशांच्या व्यावहारिक कारणावरून त्या दोन व्यापार्‍यांचं डायमंड मार्केटमधून अपहरण करण्यात होणार होते, अशी माहिती समोर आली आहे. आरोपींना आम्ही डी.बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात सोपवले आहे.

– संतोष जगदाळे,पोलीस नाईक, गावदेवी पोलीस ठाणे.

या अपहरणप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३८५, ३८७, १७०, ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शोहब खान (५०),अक्रम शेख, लक्ष्मण व बाबू अशी आहेत. या चौघांनाही न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अपहरणातून सुटका केल्यामुळे व्यापार्‍यांनी ताडदेव वाहतूक पोलीस चौकीचे पद्मनंद, संतोष जगदाळे व इथापे यांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -