घरमुंबईगिरगावातील शिवसेनेच्या दहीहंडीत तेजस ठाकरेंचे पोस्टर, 'युवा शक्ती' असा उल्लेख

गिरगावातील शिवसेनेच्या दहीहंडीत तेजस ठाकरेंचे पोस्टर, ‘युवा शक्ती’ असा उल्लेख

Subscribe

मुंबई – गिरगावात शिवसेनेकडून दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी लावलेल्या एका पोस्टरने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत याठिकाणी तेजस ठाकरेंचा मोठा पोस्टर लावला आहे. या पोस्टरवर युवा शक्ती असा उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी  तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारं नेतृत्व आहे अशा शब्दात शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी कौतुक केले.

पोस्टरवर विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ काय म्हणाले –

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यातच गिरगावात लावलेल्या या बॅनरनं तेजसच्या राजकीय एन्ट्रीचे संकेत दिलेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आयोजक शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले तेजस ठाकरे यांची जेव्हा इच्छा असेल तेव्हा ते राजकारणात येतील. आता त्यावर बोलू शकत नाही. मात्र, हे युवा नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर दिल्लीला प्रेरणादायी ठरेल असे नेतृत्व ठाकरे कुटुंबात आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी तेजस ठाकरे यांचे नेतृत्व मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारे असेल असेल हे नक्की. शिवसेना आणि मुंबईचे नाते अतुट आहे. शिवसेनेशिवाय मुंबईकरांना पर्याय नाही. महापालिकेत शिवसेना असणारच परंतु वरळीत मोठ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे निवडून येतील असा विश्वास पांडुरंग सकपाळ यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

युवासेनेची जबाबदारी तेजस ठाकरेंकडे येण्याची शक्यता –

शिवसेना सध्या ऐतिसहासिक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून पुत्र तेजस ठाकरे यांच्यावरही युवासेनेची मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -