घरक्राइमधक्कादायक! मुंबईतील गंभीर गुन्ह्यात वाढ; टक्केवारी आली समोर

धक्कादायक! मुंबईतील गंभीर गुन्ह्यात वाढ; टक्केवारी आली समोर

Subscribe

मागील 10 वर्षात मुंबईतील मुख्य गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्य सद्यस्थिती 2022 या प्रजा फाउंडेशनच्या आजच्या प्रकाशित झालेल्या अहवालात समोर आला आहे.

मागील 10 वर्षात मुंबईतील मुख्य गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्य सद्यस्थिती 2022 या प्रजा फाउंडेशनच्या आजच्या प्रकाशित झालेल्या अहवालात समोर आला आहे. (praja foundation report mumbai police mumbai crime)

या अहवालातील माहितीनुसार, मागील 10 वर्षांत म्हणजेच 2012 ते 2021 च्या कालावधीत गंभीर गुन्ह्यांमध्ये 112 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ झाली हे दिलासादायक असले तरी महिला व मुलांवरील गुणांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

- Advertisement -

मागील 10 वर्षात मुंबईतील गुन्ह्यांच्या संख्येतील वाढ

  • अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये 650 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 235 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये 172 टक्यांनी वाढ झाली आहे.
  • खून गुन्ह्यामध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • चोरी गुन्ह्यामध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • साखळी चोरी गुन्ह्यामध्ये 88 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रलंबित तपास

- Advertisement -
  • 2017मध्ये 60 टक्के वर्ग 2च्या गंभीर गुन्ह्यांचे जसे हत्या बलात्कार गंभीर दुखापत इत्यादीचे तपास कार्य प्रलंबित होते, तर 2021 मध्ये हे प्रमाण 68 टक्के राहिले आहे.
  • महिला व मुलांवरील गुन्ह्यांचे 96% खटले सन 2021 पर्यंत सुनावणीसाठी प्रलंबित आहेत.

18 टक्के मंजूर पदे रिक्त

मुंबईतील गुन्ह्यांची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि त्यांचे तपास कार्य योग्य रीतीने होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था यंत्रणा सज्ज आणि सक्षम असणे गरजेचे आहे. गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक याची महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु, 2022 पर्यंतचे आकडेवारी पाहता त्यांची 18 टक्के मंजूर पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.

2018 मध्ये मुंबई पोलीस यंत्रणेत 22 टक्के पदे रिक्त होती तर 2022 पर्यंत 28 टक्के पदे रिक्त असल्याचे समोर येत आहे.


हेही वाचा – राज्य शासनाची 100 रुपयांत दिवाळी कीट, यामध्ये भ्रष्टाचाराची शंका; शिधावाटपावरून मनसेचे सरकारला सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -