घरमुंबईप्रशासनापुढे गंभीर पेच राष्ट्रपती कोविंद यांचे हेलिकॉप्टर रायगडावर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध

प्रशासनापुढे गंभीर पेच राष्ट्रपती कोविंद यांचे हेलिकॉप्टर रायगडावर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध

Subscribe

जागतिक ठेवा असलेल्या आणि पुरातत्व विभागाकडे नोंद झालेल्या रायगडावरील तमाम मराठी माणसाची अस्मिता समजल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर येणार्‍या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हॅलिकॉप्टर रायगडावर उतरू देण्यास शिवसमर्थकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर रायगडावर उतरण्यासाठी होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरच प्रशासनाकडून हेलिपॅड तयार केला जात आहे. हॅलिपॅडमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा धुळीत माखतो आणि त्याचे सौंदर्य लोप पावत असल्याचा आक्षेप घेत या हॅलिपॅडच्या उभारणीस सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी रायगड किल्ल्यावर आल्या तेव्हाही होळीच्या माळावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. तेव्हाही हेलिपॅड उभारण्यास जोरदार विरोध झाला होता. हेलिकॉप्टर येत असताना उडणारी धूळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने जेव्हा केव्हा माळावर हेलिपॅड उभारला जातो तेव्हा त्याला शिवभक्तांनी विरोध दर्शवल्याचा इतिहास आहे. या विरोधानंतर अटल बिहारी वाजपेयी रायगडावर आले तेव्हा हेलिपॅडची जागा बदलण्यात आली. मात्र, यानंतर रायगडावर हेलिपॅड बनवण्यातही आले नाही. ६ डिसेंबरच्या सोमवारी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडावर येत असून त्यांना उतरवण्यासाठी होळीच्या माळावरच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी हेलिपॅड तयार करण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रशासनाच्या या कृतीला शिवभक्तांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. हॅलिकॉप्टर उतरताना आणि उड्डाण घेताना माळावरील धुळीत छत्रपतींचा पुतळा माखतो. ही बाब शिवभक्तांनी त्या त्या वेळी संबंधित अधिकार्‍यांच्या नजरेत आणून दिली होती. याच कारणासाठी शिवभक्तांनी उपोषण करून माळावर हेलिपॅडला ठाम विरोध दर्शवण्यात आला होता. यानंतर माळावरील हेलिपॅड काढून टाकण्यात आला होता. राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर माळावर उतरवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दौर्‍याला आमचा विरोध नाही. पण त्यांच्यासाठी माळावर हेलिपॅड बनवण्यास विरोध कायम असेल, असे जाहीर करत शिवप्रेमींनी विभागीय आयुक्तांकडे निवेदन देऊन विरोध करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -