घरमुंबईखंडणी प्रकरणी ठाकरे सरकार कोंडीत, ४० वर्षांपूर्वी बरखास्त झाल होत पवारांचं सरकार

खंडणी प्रकरणी ठाकरे सरकार कोंडीत, ४० वर्षांपूर्वी बरखास्त झाल होत पवारांचं सरकार

Subscribe

भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०१९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्ता मिळवली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी बाबत गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत सापडले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शीष्टमंडळासह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक बंद लिफाफा राज्यपालांना दिला आहे. तसेच या प्रकरणावर सीबीआई चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये पुन्हा राष्ट्रवादी सत्तेत असताना सरकार बरखास्त करण्यात आले होते याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. ४० वर्षांपूर्वी शरद पवार यांची सत्ता असताना राष्ट्रपती राजवट लावून सरकार बरखास्त करण्यात आले होते.

भाजप नेते मुनगंटीवार यांनी आताच्या सरकारच्या परिस्थीतीची तुलना १९८० मधील सरकारशी केली आहे. १९८० मध्ये शरद पवारांच्या सरकारला बरखास्त करुन राष्ट्रपती शासन लावण्यात आले होते. आता १९८० सारखी स्थिती असताना आम्ही राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी करत नसल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तसेच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले आरोपही गंभीर असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्यानंतर या प्रकरणात सरकारविरोधात रोज नवनवीन खुलासे होत असल्याने घेरले जात आहेत. या प्रकरणात परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्रात गृहमंत्र्यांनी १०० कोटी खंडणी वसूल करण्यासाठी टार्गेट दिले असल्याचे म्हटले होते. यावर भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंगल प्रभात लोढा, जयकुमार रावल, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना सचिन वाझे प्रकरणात सर्व माहिती दिली तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सारवासारव केली. राज्यपालांना या बाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

४० वर्षांपूर्वी शरद पवारांचे सरकार बरखास्त

४० वर्षांपूर्वी राज्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा १९८० मध्ये काँग्रेसने राज्यपाल सादिक अली यांची भेट घेऊन राज्यातील सर्व परिस्थीती सांगितली होती. सरकार अल्पमतात आलं होतं म्हणून पवारांचं पुलोद सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -