घरमुंबईडोंबिवलीतील पत्रकार कक्षावर निवडणूक अधिकाऱ्यांचा डोळा?

डोंबिवलीतील पत्रकार कक्षावर निवडणूक अधिकाऱ्यांचा डोळा?

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील अधिकारी निवडणुकीचे काम करण्यासाठी पत्रकार कक्षाचा वापर करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात पत्रकारांची खूपच गैरसोय होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आता उमेदवारांच्या बरोबर निवडणूक अधिकारीही निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या लगीन घाईत अधिकारी वर्ग वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी रेल्वे स्थानकाशेजारील पालिकेच्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची वास्तू धोकादायक असूनही ती पदरात पडण्याच्या विचारात आहेत. पत्रकार कक्षावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा डोळा असून त्यावर ताबा घेण्यासाठी अधिकारी वर्ग आटापिटा करीत आहे. मात्र, पत्रकार कक्षाची जागा निवडणुकीच्या कामासाठी दिल्यानंतर पत्रकारांची मोठी कुचंबणा होणार आहे.

पत्रकारांची खूपच गैरसोय होणार

कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही स्वतंत्र शहरे असून पालिकेमध्ये या दोन्ही शहरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र असा पत्रकार कक्ष आहे. बहुतांशी वृत्तपत्रांची कार्यालये ही जिल्हास्तरावर ठाणे येथे आहेत. त्यामुळे स्थानिक पत्रकारांसाठी महापालिकेने स्वतंत्र सुसज्ज पत्रकार कक्ष तयार केला आहे. त्या पत्रकार कक्षांत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचे कॅमरे आणि लॅपटॉप ठेवण्यासाठी सुविधा इंटरनेट आणि वायफाय सुविधा महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पत्रकारांच्या सोयीयुक्त जागेवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. कल्याण डोंबिवली शहरात एकूण चार विधानसभा मतदार संघ येतात. म्हणून निवडणुकीच्या काळात वार्तांकनासाठी येणाऱ्या या पत्रकारांची संख्येतही वाढ होत असते. त्यामुळे पत्रकार कक्ष निवडणूक आयोगाला दिल्यानंतर पत्रकारांची खूपच गैरसोय होणार आहे.

- Advertisement -

नक्की वाचा कल्याण पाठोपाठ आत्ता डोंबिवलीकरांची ही पूल कोंडी

पत्रकारांना वार्तांकन करणे कठीण होणार

निवडणूक आयोगाने महापालिकेकडून सावित्रीबाई संकुल, फुले नाट्यगृह, तरणतलाव, बंदिस्त सभागृह या शिवाय डोंबिवली विभागीय कार्यालयातील आंबेडकर सभागृह आणि इतर कार्यालये घेतली. त्यांना याव्यतिरिक्त अजून अधिक जागा हवी आहे. डोंबिवली इंदिरा चौकात आधिच वाहतूक कोंडीने शहरात कोंडी झाली असून जर निवडणूक आयोगाने डोंबिवली विभागीय कार्यालय काबीज केलं तर डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा वाढीव त्रास होणार आहे. निवडणूक काळात पत्रकारांना निवडणूक आयोगाने जर पत्रकारांच्या हक्काच्या जागेबाबत प्रश्न उभा केला तर मात्र येथील पत्रकारांना वार्तांकन करणे कठीण होणार आहे. याबाबत पत्रकारांनी निवडणूक अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी यातून मार्ग काढू असे सांगितले. मात्र पत्रकार कक्ष घेऊन पत्रकारांची गैरसोय करू नका अशी विनंती पत्रकारांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचाडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -