घरमुंबईपंतप्रधान विद्यार्थ्यांना देणार शारीरिक तंदुरूस्तीची शपथ

पंतप्रधान विद्यार्थ्यांना देणार शारीरिक तंदुरूस्तीची शपथ

Subscribe

राष्ट्रीय खेल दिनी ‘फीट इंडिया मुव्हमेंट’ योजनेचा शुभारंभ

राष्ट्रीय खेल दिनाच्या मुहुर्तावर फीट इंडिया मुव्हमेंट या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शारीरिक तंदुरूस्तीबाबत सर्वांना शपथ देणार आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही सकाळी 10 वाजता दूरदर्शनवरून देशवासियांना शपथ देण्यात येणार आहेत. शपथ घेण्यासाठी शाळा महाविद्यालयांनी आवश्यक ती तयारी करावी,अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.

समाजामधील प्रत्येक नागरिकाने शारीरिक व्यायाम करावा अथवा खेळामध्ये भाग घेऊन प्रकृती स्वास्थ राखावे यासाठी केंद्र सरकारने देशभरात फीट इंडिया मुव्हमेंट या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण देशामध्ये फीट इंडिया मुव्हमेंट या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथून 29 ऑगस्ट रोजी योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी जनतेला शपथ देण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ घेण्यासाठी शाळांनी व्यवस्था करण्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेतील सदस्यांनीही तंदुरूस्तीबाबत शपथ घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात व्यवस्था करावी. यावेळी गाव आणि शहरातील अधिकाधिक नागरिक उपस्तित राहतील, याची दक्षता घ्यावी. तसेच मान्यवर खेळाडू, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधींना यासाठी निमंत्रित करावे, अशा सुचनाही केंद्राच्या क्रिडा विभागाने राज्याचे मुख्यसचिव यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. तसेच गावावागाव महिला व पुरूषांसाठी सकाळचे चालणे, तरूणांसाठी धावण्याच्या मॅरेथॉन शर्यती, योगा इत्यादी शारीरीक व्यायाम होणारे उपक्रम आयोजित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थी, युवक, महिला व पुरूष यांच्यासाठी खेळांचे आयोजन करण्यासही सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -