घरमुंबईरेल्वे प्लॅटफॉर्म रुळाच्या दिशेने झुकलेले

रेल्वे प्लॅटफॉर्म रुळाच्या दिशेने झुकलेले

Subscribe

रेल्वेचा फूटबोर्ड आणि फलाट यांच्यामधील वाढलेले अंतर प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत होती. म्हणून मुंबई हायकोर्टाने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांमधील फलाटांची उंची वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फलाटांची उंची वाढविल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक फलाटांची उंची वाढवलेली नाही, तर अनेक स्थानकांमधील फलाट उंच करताना ते रेल्वे रुळाच्या दिशेने झुकवलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी नवीन समस्या बनली आहे.

प्लॅटफॉर्म सरळ बांधणे आवश्यक आहे. मात्र, आज कित्येक रेल्वे स्थानकांत लोकलच्या रुळांच्या दिशेनेच उतार दिला आहे. जर एकादा प्रवासी धावत्या गाडीतून पडला तर तो सरळ रेल्वे खाली जाईल आणि प्लॅटफॉर्म पोकळीच्या दिशेने ओढला जाईल. या समस्येचा प्रवाशांना दररोज फटका बसत आहे. कित्येक रेल्वे प्लॅटफॉर्म सरळ बांधण्यात आले मात्र सतत झीज होत असल्याने रेल्वेचा दिशेने निमुळती होत जात आहे.

- Advertisement -

१८,४२३ प्रवाशांच्या मृत्यू
२०१३ पासून ते आगस्ट २०१८ पर्यंत मुंबईतील रेल्वे अपघाताची माहिती नुकतीच समोर आली. ज्यात गेल्या पाच वर्षांत १८,४२३ जणांनी अपघातात प्राण गमावले असून, या कालावधीत जखमी झालेल्यांची संख्या १८,८८७ इतकी आहे. २०१४ मध्ये घाटकोपर येथे मोनिका मोरे या तरुणीस हात गमवावे लागले होते. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश दिले होते. मात्र आज काही स्थानकावर परिस्थिती ‘जैसे थे’ तशीच आहे.

रेल्वे प्रशासन बेजावबदारीपणे काम करत आहे. कित्येकदा रेल्वेला यासंबंधीत तक्रारी करुन सुध्दा रेल्वे यावर लक्ष देत नाही. हायकोर्टाने सर्व रेल्वे स्थानकांची उंची वाढवण्याचे आदेश दिले होते. तरीही यासंबंधी रेल्वे गंभीर दिसून येत नाही.
– सुभाष गुप्ता, रेल यात्री परिषद

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -