घरमुंबईकचरा ठेकेदार बदलण्याचा सभापतींचा प्रस्ताव

कचरा ठेकेदार बदलण्याचा सभापतींचा प्रस्ताव

Subscribe

पालघर शहरात सुरू असलेला कचरा उचलण्याचा ठेकेदार अपयशी ठरल्याने शहरात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढिग साचून राहिले आहेत. याप्रकरणी दैनिक ‘आपलं महानगर’ने लक्ष वेधले होते. याची दखल घेत आरोग्य सभापतींनी ठेकेदार बदलण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. येत्या विशेष सर्वसाधारण सभेत त्याला मंजूरी मिळाल्यानंतर नवा ठेकेदार नेमण्यात येणार आहे.

कचरा ठेकेदारंच्या वाहनांना जीपीएस लावण्याचे ठेक्याच्या करारात नमूद असतानाही जीपीएसचा वापर किती होतो यावर अनेक नगरसेवकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पारदर्शक कारभाराचा आव आणणारे प्रशासन याकडे मात्र काना डोळा करताना दिसत आहे. ठेकेदार आपल्याकडे 80 सफाई कामगार असल्याचे सांगतो. त्यात गैरकारभार होऊ नये यासाठी कर्मचार्‍यांची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पन्नास सफाई कर्मचारी काम करीत असल्याचे उजेडात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकादाराकडे कंत्राट आहे. पण, त्याच्याकडे अवघे पन्नास सफाई कर्मचारी आहे. एक लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरासाठी ही संख्या अतिशय अपुरी आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागाबाबत काही समस्या असल्यास आणि कोठेही कचरा साचले असल्यास, वेळेत कचरा उचलला गेला नसल्यास माझ्या 9322201203 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा. त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल.
लक्ष्मीदेवी हजारी,आरोग्य सभापती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -