घरताज्या घडामोडीविविध शुल्कात दरवर्षी ५% दरवाढ करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल

विविध शुल्कात दरवर्षी ५% दरवाढ करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, पालिकेकडून आगामी काळात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ लादू देणार नाही, अशी ग्वाहीही मुंबईकरांना दिली आहे.

मुंबईकरांना कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेलेले असताना मुंबई महापालिका प्रशासनाने महसुलात वाढ करण्यासाठी विविध आकार / शुल्कात दरवर्षी ५% दरवाढ करण्याबाबत मंजुरीसाठी सादर केलेला प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने एकमताने विरोध दर्शवत दप्तरी दाखल केला.
त्यामुळे संबंधित मुंबईकर जनतेला या दरवाढीच्या फटक्याची झळ न बसता मोठा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भातील माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, पालिकेकडून आगामी काळात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ लादू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी मुंबईकरांना दिली आहे.

महापालिका कीटकनाशक विभागाच्या खात्यामार्फत, पाण्याची कारंजी, सुशोभित हौद, दगडांच्या / खडकांच्या कलाकृती, कृत्रिम धबधबे इत्यादींच्या उभारणीसाठी आवश्यक अर्ज पुस्तिकेसाठी १०० रुपये ऐवजी यापुढे १०५ रुपये शुल्क वसुली करणे. तसेच, पडताळणी फी ४०० रुपयांवरून ४२० रुपये, परवानगी व नूतनीकरण फी ६ हजार रुपयांवरून ६ हजार ३०० रुपये, सुरक्षा अनामत रक्कम २० हजार रुपयांवरून २१ हजार रुपये, अशी शुल्कवाढ करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. मात्र या प्रस्तावाला व दरवाढीला सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे या विरोधाची दखल घेऊन सदर प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला आहे, असे यशवंत जाधव यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Photo: पहिल्या दिवशी १७ हजार प्रवाशांना लोकलचा पास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -