घरCORONA UPDATECorona: एसटी कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी सुविधा द्या; भाई जगताप यांची मागणी

Corona: एसटी कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी सुविधा द्या; भाई जगताप यांची मागणी

Subscribe

परळ आणि मुंबई सेंट्रल या आगारातूनही अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेस सोडल्या जातात. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

परळ आणि मुंबई सेंट्रल ही एसटी महामंडळाची दोन प्रमुख आगारं मुंबईत आहेत. या दोन्ही आगारांवर कोरोनाच्या अनुषंगाने दक्षता घेणे आता गरजेचे झाले आहे. कारण या दोन्ही परिसराची गणना कोरोना हॉटस्पॉटमध्ये झाली आहे. परळ आणि मुंबई सेंट्रल या आगारातून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेस सोडल्या जातात. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याकरता या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने दररोज थर्मल स्कॅनिंग आणि आरोग्य तपासणीसाठीची सुविधा त्वरीत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या सेवेत एसटी

आतापर्यंत मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात तब्बल १ हजार १३५ कोरोनाची लागण झालेले रुग्ण आहेत. तर एकट्या मुंबईत हा आकडा ७१४ वर गेला आहे. मुंबईत जिथे जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तो परिसर खबरदारी म्हणून प्रशासनाने सील केला आहे. मुंबई सेंट्रल आगाराजवळील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या एसटीच्या विभागात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वछता कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी यांच्या सुविधेसाठी एसटी बसेस आज रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. आता तर चक्क परळ आणि मुंबई सेंट्रल डेपोच्या बाजूलाच कोरोना हॉटस्पॉट परिसर असल्याने एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

आरोग्यची काळजी घ्यावी

कोरोनासारखे जागतिक संकट आज देशासमोर उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी एसटीचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्राणांची बाजी लाऊन काम करत आहेत. महामंडळाकडून एसटीच्या चालक-वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हँड ग्लोज, मास्क, सॅनिटायझर तसेच जेवणाची व्यव्यस्था करण्यात आली आहे. तरीही खबरदारी म्हणून एसटी डेपोत आरोग्य तपासणीची स्वतंत्र सुविधा देण्यात यावी. शिवाय कर्मचाऱ्यांची आरोग्याविषयी काळजी घ्यावी, काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली आहे.

हेही वाचा –

“… तुझे हातपाय मोडले असते”; पोलीस अधिकाऱ्याची आव्हाडांना धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -