घरताज्या घडामोडी"... तुझे हातपाय मोडले असते"; पोलीस अधिकाऱ्याची आव्हाडांना धमकी

“… तुझे हातपाय मोडले असते”; पोलीस अधिकाऱ्याची आव्हाडांना धमकी

Subscribe

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट रिट्विट करुन एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याबद्दल वापरलेली भाषा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ठाण्यातील अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट रिट्विट केलं आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकांनी आव्हाड यांचे हायपाय तोडण्याची भाषा केली आहे. सतिश कुलकर्णी असं या पोलीस उपनिरीक्षकांचं नाव आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट रिट्विट करुन एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याबद्दल वापरलेली भाषा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुहास गाडेकर यांनी एक ट्विट केलं आहे. “स्वारगेट पोलीस स्टेशनचे PSI सतीश कुलकर्णी यांचे आव्हाड साहेबांविषयी कंमेट्स पहा. जनतेचे सेवक आणि अधिकारी लोकप्रतिनिधीवर अशी भाषा वापरत असतील तर यावर कारवाई अपेक्षित आहे. खाली लिंक देतोय,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे ट्विट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रिट्विट केलं आहे.

- Advertisement -

 PSI सतीश कुलकर्णी यांनी फेसबुकवर काय लिहिलं आहे?

“अरे जित्या तू तर हंडगा आहेस का? एकट्याला १०/१५ जणांना मारायला लावतोस.तू एकट्याने लढायचं होतं. निश्चितच तुझे हातपाय मोडले असते.”

- Advertisement -

हेही वाचा – किचनमध्ये शिधा, फ्रीजमध्ये फळं…मग मागितलं फूकटचं रेशन

दरम्यान, या प्रकरणावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मौन सोडलं आहे. मी कधीच कायदा हातात घेत नाही. तीन-चार दिवसांपासून सदर मनुष्य अश्लील शिविगाळ करत आहे. तसंच माझ्या मुलीवर, बायकोवर बलात्कार करणार, अशा धमक्या देत आहे. माझ्याच नावाचे फेक अकाऊंट तयार करतो. माझा दाभोळकर होणार अशी धमकी देणारं ट्विट केलं जातं. एक माणूस अमरावतीवरुन येतो. तो सांगतो, आम्ही थेट गोळ्या घालतो डोक्यामध्ये. त्यामुळे कोण कायदा हातात घेतो, याचा विचार करणं गरजेचं आहे. मुळात मी अशा पोस्टकडे कधीच लक्ष देत नाही. आपण आपले काम करत रहायचं, हेच मी कार्यकर्त्यांनाही सांगत असतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -