घरमुंबईजगभरातील १२५ दशलक्ष लोक 'या' आजाराने ग्रस्‍त

जगभरातील १२५ दशलक्ष लोक ‘या’ आजाराने ग्रस्‍त

Subscribe

सोरायसिस हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. सोरायसिस रुग्‍णांना लोकांकडून मिळणारी सहानुभूती आणि पाठिंबा दीर्घकाळापर्यंत आजारावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत करतो.

सोरायसिस हा स्‍वयंप्रतिरोधक आजार आहे. या आजारामध्‍ये खाज येणे, त्वचेवर लालसर डागांसोबतच पुरळ येतात. हे पुरळ नेहमीच्‍या पुरळाप्रमाणे असू शकतात. पण शरीराची रोगप्रतिकार शक्‍ती स्‍वत:च्‍याच आरोग्‍यदायी पेशींवर हल्‍ला करतात, तेव्‍हा सोरायसिस हा आजार होतो. यामुळे नवीन त्‍वचा पेशी निर्माण होऊन त्‍वचेवर कोरडे चट्टे दिसू लागतात. जगभरातील जवळपास १२५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्‍त आहेत.

प्रभावी उपचारांमुळे नियंत्रित राहतो

अनेकदा समजला जाणारा कॉस्‍मेटिक/त्‍वचेच्‍या आजारासारखा हा आजार नाही. त्यामुळे त्याची लक्षणे जरी सामान्य पुरळसारखी असली तरी त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. शिवाय, सोरायसिस स्‍पर्शाच्‍या माध्‍यमातून पसरतो असा गैरसमज आजही समाजात आहे. सोरायसिस स्‍वयंप्रतिरोधक स्‍वरुपाचा असल्यामुळे या आजारातील व्यक्ती बरी होऊ शकत नाही. पण, प्रभावी उपचारांमुळे त्‍यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

याविषयी ज्येष्ठ डर्माटोलॉजिस्‍ट डॉ. सतिश उदारे यांनी सांगितलं की, ” सोरायसिसवर नियंत्रण ठेवता येऊ शकते पण, तो पूर्णपणे बरा होत नाही. ही एक समस्‍या आहे. सोरायसिसने पीडित रूग्‍णांचे जवळचे मित्र, कुटुंब आणि सहकारी यांच्यात जागरूकतेच्‍या अभावामुळे सोरायसिस आणि संबंधित परिणामांमागील कारणं आणि लक्षणं समूजन घेणे महत्‍त्‍वाचे आहे. या आजारातील बहुतेक रूग्‍ण चिंताग्रस्‍त, तणावग्रस्‍त असतात आणि ते सोरायसिस आजारातून मुक्‍त होण्‍यासाठी जलद आणि सुलभ उपचाराच्‍या शोधात असतात. पण, हा आजार बरा होत नाही. ”

- Advertisement -

वैद्यकीय उपचारांचे पालन करावे

सोरायसिसच्‍या प्रभावी उपचारांमध्‍ये सकारात्‍मकता महत्त्वाची असली तरी डॉक्‍टरांनी सांगितलेल्‍या वैद्यकीय उपचारांचे पालन करणे देखील तितकेच महत्‍त्‍वाचे आहे. सोरायसिस रुग्‍णांना लोकांकडून मिळणारी सहानुभूती आणि पाठिंबा दीर्घकाळापर्यंत आजारावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत करतात, असं ही डॉ. सतिश उदारे यांनी स्पष्ट केलं आहे.

”सुरूवातीला माझ्या सहकाऱ्यांना सोरायसिसमागील कारणे स्‍पष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न केला. पण मला समजले की, पूर्ण हाताच्‍या शर्टससह माझा हात संपूर्ण झाकून ठेवणे सोपे आहे. या आजाराबाबत अधिक जागरूकता निर्माण केली पाहिजे. पण हे एक मोठे आव्‍हान आहे.” – सत्‍या मिश्रा , सोरायसिस पीडित रुग्‍ण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -