घरमुंबईसिरीयल बलात्कार्‍याला पकडण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती

सिरीयल बलात्कार्‍याला पकडण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती

Subscribe

वसई : नालासोपार्‍यात चार दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या सिरीयल बलात्कार्‍याला पकडण्यासाठी पोलीसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नालासोपारा शहरातील मुख्य रस्त्यांवर त्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोलीस त्याची माहिती देऊन नागरिकांना खबरदारीचे उपाय सांगत आहेत.

गेल्या दीड वर्षात नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे थैमान घालणार्‍या या बलात्कार्‍याला पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी होर्डींग लावले आहेत. तरीही नालासोपार्‍यात त्याने चार दिवसांत दोन मुलींवर अत्याचार केल्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत. शेवटी त्याला पकडण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शाळांमध्ये जाऊन,विद्यार्थी आणि पालकांनाही या बलात्कार्‍याची माहित देण्यात येत आहे. अनेक गणपती मंडळांच्या व्यासपीठावर जाऊनही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण जाणून घेण्यासाठी हे ही वाचा 

रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर रिक्षाचा वापर त्याच्याकडून केला जात असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचे पोस्टर्स रिक्षाचालकांमध्ये वाटण्यात आले आहेत. तसेच त्याची गुन्हे करण्याची पद्धतही सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -