घरमुंबईथंडीचा पारा वाढल्याने पुणेकरांना भरली हुडहुडी

थंडीचा पारा वाढल्याने पुणेकरांना भरली हुडहुडी

Subscribe

महाबळेश्वरमध्ये थंडी पडल्याने पसरली धुक्याची दाट चादर

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. जम्मू-काश्मीरम, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्येही कमलीची थंडी पडली आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी पडली असल्याचे दिसते आहे. पुणे शहरात मागील काही दिवसांपासून थंडीचा पारा वाढल्याने पुणेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. पुण्यात तापमानाचा पारा घसरल्यामुळे थंडी वाढली आहे. मंगळवारी सगळ्यात नीचांकी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतही तापमानाचा पारा घसरल्यामुळे रात्री थंडी होती.

पुण्यात थंडीने हुडहुडी भरवली असल्याने नागरिक स्वेटर्स, मफलर्स व कानटोपरे बाहेर पडल्याचे दिसून आले. वारा सुटला होता त्यामुळे शहरात चांगलाच गारवा पसरला होता. सकाळी वातावरणात गारवा होता व्यायाम करण्यासाठी लोक गरम कपड्यांत आलेले होते.

- Advertisement -

महाबळेश्वरमध्येही कडाक्याची थंडी पडली होती. महाबळेश्वरमध्ये थंडी पडल्याने धुक्याची दाट चादर पसरली होती. वाहनचालकांना गाडी हाकताना धुक्यामुळे चांगलीच दमछाक झाली असल्याचे पाहिले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -