घरमुंबईशिंदे आणि ठाकरे गटात पुन्हा 'सामना'; शेवाळे यांनी धाडली नोटीस

शिंदे आणि ठाकरे गटात पुन्हा ‘सामना’; शेवाळे यांनी धाडली नोटीस

Subscribe

दैनिक सामनाचे संपादक, कार्यकारी संपादक, पत्रकाराला ही नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या नोटीसला काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खासदार शेवाळे यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. मात्र हे आरोप खोटे आहेत. मला जाणीवपूर्वक याप्रकरणात गोवण्यात आले आहे. मुळात या महिलेचेच दाऊदशी संबंध आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली.

मुंबईः शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दैनिक सामना व दोपहरा का सामनाला नोटीस पाठवली आहे. चुकीचे वृत्त दिल्याने माझी नाहक बदनामी झाली आहे. त्यामुळे बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.

दैनिक सामनाचे संपादक, कार्यकारी संपादक, पत्रकाराला ही नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या नोटीसला काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खासदार शेवाळे यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. मात्र हे आरोप खोटे आहेत. मला जाणीवपूर्वक याप्रकरणात गोवण्यात आले आहे. मुळात या महिलेचेच दाऊदशी संबंध आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली.

- Advertisement -

खासदार शेवाळे यांच्या या दाव्याचेही पीडित महिलेने सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसारीत करत उत्तर दिले. मी दुबईची आहे. मी फॅशन डिझायनर आहे. मी अथक परिश्रम करुन करिअर केले आहे. मी दुबईची असल्याने अनेक देशात माझे मित्र आहेत. पाकिस्तान असो की बांगलादेश तेथील माझे मित्र आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी माझ्यावर तथ्यहिन आरोप केले आहेत, असा दावा पीडित मुलीने केला.

राहुल शेवाळे मला भेटायला दुबईत येत होते. त्यानंतर ते कोणत्या कोणत्या देशात जात होते याचा तपास एनआयएने करावा. त्यांच्या विमान प्रवासाच्या तपशीलातून सर्व सत्य समोर येईल. ते पाकिस्तान, कराची व अन्य कुठे कुठे गेले होते याची माहिती एनआयएने घ्यावी. त्यांचे कुठे कुठे व्यवसाय आहेत. हाॅटेल व रिअल ईस्टेटचे व्यवसाय कुठे कुठे आहेत. त्यांना पैसे कुठुन मिळतात, हे एनआयएने तपासावे, अशी मागणी पीडित मुलीने केली.

- Advertisement -

मला न्याय हवा आहे. राहुल शेवाळे यांनी मला मानसिक, शारीरीक त्रास दिला आहे. दारु पिऊन अत्याचार केला आहे. माझे दाऊदशी संबंध आहेत हे माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी दुबईतही राहुल शेवाळेविरोधात आवाज उठवला होता. मात्र तेथेही माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली. मला तुरुंगात टाकण्यात आले. तेथील न्यायालय व तुरुंगातील फोटो राहुल शेवाळे यांच्याकडे आहेत. त्यामुळे एनआयएने त्यांची आधी चौकशी करावी, अशी मागणीही पीडित मुलीने केली आहे.

त्यांनतर याप्रकरणी दैनिक सामना व दोपहरा का सामनामध्ये एक वृत्त छापून आले. याविरोधात खासदार शेवाळे यांनी नोटीस बजावून बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -