घरमुंबईरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Subscribe

रेल्वे मार्गिका, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर यांच्या देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे रविवारी मोठे हाल होणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते सायंकाळी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. धीमी लोकल ठाणे स्थानकाहून मुलुंड ते माटुंगा या स्थानकादरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. या लोकलला मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर ही लोकल माटुंगा स्थानकावरून धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजून ४ मिनिटांपासून ते सायंकाळी ३ वाजून ६ मिनिटांनी कल्याणहून सुटणार्‍या जलद लोकलला नियमित थांब्यासह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

सकाळी १० वाजून १६ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार्‍या जलद लोकलला नियमित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणार्‍या लोकल सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ०८ मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी १० वाजून २१ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणार्‍या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम ते गोरेगाव या दरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर जम्बो ब्लॉक आहे. सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांपासून ते दुपारी ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी सुटणार्‍या लोकल रद्द केल्या आहेत. सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून २९ मिनिटांपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाव ते सीएसएमटीसाठी सुटणार्‍या लोकल रद्द केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -