घरक्रीडासंघ चांगली कामगिरी करत असेल तर कर्णधाराचे काम सोपे

संघ चांगली कामगिरी करत असेल तर कर्णधाराचे काम सोपे

Subscribe

आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबादने दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करत आपला या मोसमातील सलग तिसरा विजय नोंदवला. तसेच या विजयामुळे हैद्राबादने आयपीएलच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांचे ४ सामन्यांत ६ गुण झाले आहेत. मधल्या फळीतील फलंदाज वगळता हैद्राबादच्या इतर खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. संघातील खेळाडू अशी कामगिरी करत असतील, तर कर्णधाराचे काम अगदी सोपे होते, असे हैद्राबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार म्हणाला. केन विल्यमसनला दुखापत झाल्यामुळे उपकर्णधार असणार्‍या भुवनेश्वरला ४ पैकी ३ सामन्यांत संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे.

संघ जेव्हा चांगली कामगिरी करत असेल, तेव्हा कर्णधाराचे काम अगदी सोपे होते. कर्णधार हा तितकाच चांगला जितका त्याचा संघ, असे भुवनेश्वर म्हणाला. तसेच दिल्ली आणि हैद्राबाद यांच्यातील सामन्याच्या खेळपट्टीवर टीका होत आहे. दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगनेही या खेळपट्टीवर टीका केली. खेळपट्टीबाबत भुवनेश्वर म्हणाला, नाणेफेक होताना मला ही खेळपट्टी कशाप्रकारची असेल याचा अंदाज येत नव्हता. आम्हाला ही खेळपट्टी ज्याप्रकारची होती, त्याचे आश्चर्य वाटले नाही, मात्र आम्हाला दुसर्‍या डावात ही खेळपट्टी फार संथ असेल असे वाटले नव्हते. या स्पर्धेच्या उत्तरार्धात अशाच खेळपट्ट्या सर्व मैदानांवर पहायला मिळतील. त्यामुळे आम्हाला संघ निवडताना काळजी घ्यावी लागेल.

- Advertisement -

हैद्राबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही २८ चेंडूत ४८ धावा करत हैद्राबादच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे फार अवघड होते, असे सामन्यानंतर बेअरस्टोवने सांगितले. या खेळपट्टीवर चेंडूला अपेक्षा होती, तितकी उसळी मिळत नव्हती. या खेळपट्टीवर कसे खेळले पाहिजे याचा आम्हाला दिल्लीच्या डावात अंदाज आला होता. त्यामुळे आम्हाला नाणेफेक जिंकल्याचा फायदा झाला. यंदाच्या स्पर्धेत अशा खेळपट्टीवर खेळण्याची माझी पहिलीच वेळ होती. मी या स्पर्धेची चांगली सुरुवात केली आहे आणि मला आशा आहे की मी पुढेही चांगली कामगिरी करू शकेन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -