घरमुंबईमुंबईत पुन्हा पाऊस; मुंबईकरांची उडाली तारांबळ

मुंबईत पुन्हा पाऊस; मुंबईकरांची उडाली तारांबळ

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे बरेच मुंबईकर घरातून बाहेर पडताना छत्री सोबत घेत नाहीत. मात्र, अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे अनके जणांना पावसात भिजावे लागले आहे.

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडला. सकाळी कार्यालयात जाण्याच्या ऐन गर्दीच्या वेळी पाऊस पडल्याने चाकरमाण्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे बरेच मुंबईकर घरातून बाहेर पडताना छत्री सोबत घेत नाहीत. मात्र, अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे अनके जणांना पावसात भिजावे लागले आहे. सकाळच्या वेळी शाळा, महाविद्यालय, कार्यालयात जाण्यासाठी रस्त्यांवर प्रचंड रहदारी असते. मात्र, पाऊस सुरु झाल्यामुळे जागोजागी लोक रस्त्याच्या कडेला थांबले. त्यामुळे काही भागांमध्ये काही काळासाठी वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली होती.

आज सकाळी साडे आठ वाजेपासून पावसाला सुरुवात

मुंबईत शुक्रवारी ढगाळ वातावरण होते. याशिवाय शुक्रवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास ठाणे, दिवा, कल्याण आणि बदलापूर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्यानंतरही रात्रभर वातावरण ढगाळ होते. आज सकाळी देखील ढगाळ वातावरण होते. सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास मुंबई आणि उपनगरामध्ये रिमझिम सरींना सुरुवात झाली. त्यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामध्ये छत्री सोबत न नेलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.

- Advertisement -

मुंबई पुन्हा का आला पाऊस?

यावर्षी मुंबईसह संपूर्ण राज्यात प्रचंड पाऊस पडला. महिन्याभरात काही दिवस सोडले तर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, आज पुन्हा पाऊस सुरु झाला. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज मुंबई, ठाणे आणि उपनगरात पाऊस पडत आहे. मुंबईत आज दिवसभर पावसाचे सावट असणार आहे. याशिवाय उद्या मतदानाच्या दिवशी देखील मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


हेही वाचा – अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज; मंगळवारपासून सेटवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -