घरताज्या घडामोडीमुंबईत शहरापेक्षा उपनगरांत पावसाचे प्रमाण जास्त, पाण्याच्या साठ्यात वाढ

मुंबईत शहरापेक्षा उपनगरांत पावसाचे प्रमाण जास्त, पाण्याच्या साठ्यात वाढ

Subscribe

उपनगरात पडणाऱ्या एकूण पावसाच्या पाण्यापैकी काही प्रमाणात या पाण्याचा वापर

मुंबईत जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाळा सुरुवात झाली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यातील चार महिन्यात सरासरी २४००.०० मिमी इतका पाऊस पडतो. यंदा ८ जूनपासून ते ३० जून या कालावधीत शहर भागात ६९७.५९ मिमी, पूर्व उपनगरात – ८०६.७९ मिमी तर पश्चिम उपनगरात – ७५६.८७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून शहर भागापेक्षाही उपनगरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येते. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे केवळ तुळशी, विहार या छोट्या तलावांत पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात काही प्रमाणात वाढ होते. तर क्षारयुक्त पाणीसाठा असलेल्या पवई तलावात काही प्रमाणात पाऊस पडतो.

म्हणजे उपनगरात पडणाऱ्या एकूण पावसाच्या पाण्यापैकी काही प्रमाणात या पाण्याचा वापर होतो. उर्वरित पावसाचे पाणी व शहर भागातील पावसाचे पाणी हे पूर्णपणे वाया जाते. नद्या, नाल्यांवाटे ते पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. गेल्या ८ जूनपर्यन्त मुंबईत जो पाऊस पडला, त्यानुसार शहर भागात – १३५.४१ मिमी, पूर्व उपनगरात – ११५.०१ मिमी तर पश्चिम उपनगरात – ९६.३४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर ३० जून रोजीपर्यन्त शहर भागात ६९७.५९ मिमी, पूर्व उपनगरात – ८०६.७९ मिमी तर पश्चिम उपनगरात – ७५६.८७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची सरासरी काढल्यास शहर भागात -३०.४०मिमी तर उपनगरे भागात – २८.९१ मिमी इतक्या आणि संपूर्ण मुंबईत सरासरी ३०.१६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

राज्यात पावसाची दडी

राज्यात जूनच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पावसाच्या आगमनामुळे राज्यातील शेतकरी सुखावला होता परंतु पावसाने पुन्हा दडी मारली असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. परंतु मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही असल्याचे आयएमडीने सांगितले आहे. तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या ८ जुलै आणि ९ जुलै या कालावधीत पाऊस दमदार पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -