घरमुंबईसध्या घशाला आराम देतोय म्हणत राज ठाकरेंनी दिले निवडणुकीचे संकेत

सध्या घशाला आराम देतोय म्हणत राज ठाकरेंनी दिले निवडणुकीचे संकेत

Subscribe

राज ठाकरे यांनी जानेवारीपासून बोंबलायचं आहे, निवडणुका लागतील असे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी निवडणुकीचे संकेत दिले आहे. राज्यात लवकरच निवडणूका लागतील असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईमधील परळयेथे कामगार मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण महोत्सवाचे आयोजन कारण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता काल रविवारी १३ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी जानेवारीपासून बोंबलायचं आहे, निवडणुका लागतील असे म्हणाले.

- Advertisement -

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोकण महोत्सवात राज ठाकरे म्हणाले; मी आता भाषणाला उभा नाही. मी सध्या घशाला आराम देतो आहे. कारण जानेवारीपासून बोंबल बोंबल बोंबलायचं आहे. कारण निवडणुका लागतील. घसा एवढ्यासाठीच बोललो कारण गळा हा लता मंगेशकर यांसारख्या व्यक्तींचा असतो. घसा आपलाच असतो. त्यामुळे घशाला जरा आराम देतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

मध्यवधी निवडणुकीसाठी तयार राहा : उद्धव ठाकरे
यापूर्वी राज्यातील ठाकरे गटाच्या सर्व गटप्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. यावेळी बोलताना मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे तुम्ही तयारा राहा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले . त्यावर सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रियासुद्धा आल्या होत्या. आमदार फुटू नयेत म्हणून उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचे वक्तव्य केले असे आशिष शेलार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीसुद्धा निवडणुका लागतील असे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक
दरम्यान पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची आज वांद्रे एमआयजी क्लब येथे बैठक बोलावली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली. मुंबईतील लोकसभा निहाय परिस्थितीचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे या बैठकीत संवाद साधणार आहेत. त्याचसोबत 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत मनसे गट नेत्यांचा जो मेळावा होणार आहे त्याच्या तयारीचाही आढावा घेतला जाणार आहे. मनसेने याआधीच निवडणुका स्वबळावर लढण्याचे बोलले जात आहे. निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहेत.


हे ही वाचा –  जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मविआतील महिला नेत्या एकत्र, राज्यपालांची भेट घेणार

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -