घरताज्या घडामोडी'या'मुळे राज ठाकरेंना विधान भवनात येण्यास नकार

‘या’मुळे राज ठाकरेंना विधान भवनात येण्यास नकार

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी विधानभवनात येणार होते. मात्र, ते काही कारणासाठी आलेच नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधान भवनात जाणार होते. मात्र, नियमानुसार राज ठाकरेंना विधानभवनात प्रवेश करण्यासाठी कोविड १९ची आरटीपीसीआर ही चाचणी करणे बंधनकारक होते. कारण नियमानुसार त्यांना चाचणी केल्याशिवाय विधान भवनात प्रवेश दिला नसता. तसेच राज ठाकरेंनी आरटीपीसीआर चाचणी देखील केली नसल्याने स्वत: राज ठाकरे यांनी विधानभवनात येण्याचे टाळले. परंतु, विधान भवनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आलेत आहेत त्यांचे पालन राज ठाकरे करणार होते का? हा देखील प्रश्नच आहे. अशा चर्चा विधानभवनात रंगताना दिसत आहेत.

राज ठाकरे मास्क लावत नाहीत

राज ठाकरे यांनी आरटीपीसीआरची चाचणी केली नसल्याने ते स्वत:चा विधानभवनात आले नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे मास्क देखील लावत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच तोंडाला मास्क लावले नव्हते. याबाबत त्यांना माध्यमांनी विचारणा केली असता ‘मी मास्क लावत नाही’, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिम कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांना माध्यमांनी विचारणा केली की, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही येता आणि मास्क लावत नाही. तुम्ही मास्क लावत नाहीत का? यावर ते म्हणाले ‘मी मास्क लावत नाही. हे तुम्हालाही सांगतो’.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Assembly Budget Session 2021 : तूर्तास घरगुती, कृषी ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम स्थगित – राज्य सरकारचे आदेश


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -