घरमुंबईराज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र; भाजपवर 'संक्रांत'!

राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र; भाजपवर ‘संक्रांत’!

Subscribe

राज ठाकरेंनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने नव्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सवर्णांसाठीच्या १० टक्के आरक्षणावरून निशाणा साधला आहे.

सत्ताधाऱ्यांवर आपल्या व्यंगचित्रांमधून वेळोवेळी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. दिवाळीत तर त्यांनी सेना-भाजपच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढणारी व्यंगचित्रांची एक सीरीजच काढली होती. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढलं असून त्याला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. संक्रांतीच्या निमित्ताने जनता साधे पतंग उडवत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आश्वासनांचं पतंग उडवत असल्याचं या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी दाखवलं आहे.

आरक्षणाची नवी पतंग!

या व्यंगचित्रामध्ये एका घराच्या गच्चीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, नितीन गडकरी, काही मोदी भक्त आणि काही माध्यम प्रतिनिधी पतंग उडवत आहेत. त्यामध्ये नरेंद्र मोदींच्या हातात एका पतंगाचा मांजा असून त्यावर न्यू लाईज अर्थात नवीन खोटं वचन असं लिहिलं आहे. त्याखाली १० टक्के आरक्षण असं लिहिलं आहे. केंद्र सरकारने अतिशय वेगाने नुकताच आर्थिक मागास सवर्णांसाठी नोकरीमध्ये १० टक्के आरक्षणाचा कायदा पारित केला. त्यावर यातून निशाणा साधला आहे.

- Advertisement -

भाजपनं तोंड का फिरवलं?

याच गच्चीवर पंतप्रधानांच्या मागे अमित शाह, मोदी भक्त आणि काही मोदीप्रेमी प्रसारमाध्यमांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एक व्यक्तीने हातात मांजाची फिरकी घेतलेली आहे. विशेष म्हणजे या सगळ्यांच्या मागे भाजप मात्र मोदींच्या या नव्या आश्वासनावर नाराज होऊन तोंड फिरवून उभी आहे असं दाखवण्यात आलं आहे. त्याच गच्चीवर खाली मोदींनी आत्तापर्यंत दिलेल्या अनेक आश्वासनांचे पतंग पडले आहेत.


हेही वाचा – ‘राग आणीबाणी’…राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून वर्तवले भाकीत

आश्वासनं नाहीत तर थापा!

गेल्या साडेचार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा अनेक आश्वासनं दिली. मात्र ही आश्वासनं नसून मोदींनी मारलेल्या थापाच होत्या, अशा आशयाचं हे व्यंगचित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -